मुंबई : महाराष्ट्राला हजारो वर्षांची अध्यात्मिक वारसा लाभला आहे. हाच अध्यात्मिक वारसा पुढे चालवणाऱ्या ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन विद्यापीठाच्या वतीने 'द लिव्हिंग लेजंड' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नानासाहेब धर्माधिकारी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक आणि अध्यात्मिक विषयात भरपूर मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी आणि नातू सचिन धर्माधिकारी यांनी त्याचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य सुरू ठेवले. याच पार्श्वभूमीवर २५ फेब्रुवारी रोजी युरोपियन विद्यापीठाकडून अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'द लिव्हिंग लेजंड' आणि सचिन धर्माधिकारी यांना 'मानद डॉक्टरेट' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या ७५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबाला सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. २५ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण होताच राज्यभर धर्माधिकारी यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला