ठाणे : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खोट्या माहितीच्या आधारे मद्यविक्री परवाना मिळवला असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला असून कोपरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी ही तक्रार केली. काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द करण्यात आला होता.