काबुल : हमीद करझाई अंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची ओळख अमेरिकेला यश आले आहे. या दुर्घटनेत तेरा अमेरिकन सैनिकांसोबत २०० जणांनी प्राण गमवले होते. इस्लामिक राज्यातील दहशतवादी अब्दुल रहमान अल-लोगरीने हा हल्ला केल्याचे द न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीतून पुढे आले. त्याला कडक सुरक्षा असलेल्या जेलमधून सोडवण्यात तालिबानचा हात होता. ऑगस्टमध्ये तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर तुरूंगातून मुक्त झालेल्या दहशतवाद्यांपैकी अल-लोगारी एक होता. २०१७ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाईंड होता.
हल्ल्याच्या चार महिन्यानंतर अमेरिका आणि विदेशी गुप्तचर अधिकाऱ्यांनी हल्ल्यात सहभागी झालेल्या इतर लोकांची ओळख पटवण्यासाठी अल-लोगारीचे प्रोफाईल एकत्र करून त्याचा उपयोग आयएस सेलवर लक्षकेंद्रीत करण्यासाठी करणार असल्याचे सांगितले जाते. अल-लोगारी अफगाणिस्तानमधील पुल-ए-चरकी आणि परवान या दोन्ही तुरुंगांमध्ये होता, परंतु तो काबुलमधील ISIS-K सेलमध्ये कसा सामील झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.