गुरुग्रंथसाहिब अफगाणिस्तानातून भारतात दाखल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान दूरध्वनीवरून सुमारे ४५ मिनीटे चर्चा झाली. यावेळी अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि भारत–रशिया सहकार्य याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये झाली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केली आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणस्तानमधील स्थितीविषयी अमेरिकेसह भारत आणि रशियाचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.
त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीद्वारे ४५ मिनीटे चर्चा झाली. त्याविषयी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले, माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीविषयी चर्चा केली. त्याचप्रमाणे भारत – रशिया सहकार्य, द्विपक्षीय धोरण आणि करोनाविषयीदेखील चर्चा करण्यात आली. महत्वाच्या विषयांवर परस्परांशी सल्लामसलत करण्याविषयी दोन्ही राष्ट्रांमध्ये एकमत झाले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गुरुग्रंथसाहिब अफगाणिस्तानातून भारतात दाखल
अफगाणिस्तानातून मंगळवारी ७८ जणांना भारतात आणण्यात आले. त्यामध्ये २५ भारतीय तर उर्वरित अफगाणी नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतात आलेल्या तुकडीसोबत अफगाणिस्तानातील गुरुद्वारामधून शीखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहिबच्या प्रतीदेखील भारतात आणण्यात आल्या आहेत. यावेळी दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुग्रंथसाहिबच्या प्रती आपल्या डोक्यावर ठेवून सन्मानाने बाहेर आणल्या.