जाणून घ्या काय आहेत या अनोख्या रेल्वेपुलाची वैशिष्ट्य
नवी दिल्ली: जगातील सगळ्यात मोठा रेल्वे पूल भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये तयार होत आहे. या पुलाचे बांधकाम सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरू झाले. चिनाब नदीवर हा पूल बांधला जात आहे. रेल्वे मंत्रालय आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या पुलाच्या काही तथ्यांविषयी माहिती देणारा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. 'चिनाब ब्रिज' या विभागात बांधल्या जाणार्या प्रमुख रचनांपैकी हा एक आहे.
चिनाब नदीवर बांधलेला हा पूल नदीच्या पातळीपासून ३५ मीटर उंचीवर आहे. हे काश्मीर खोरे उर्वरित भारताशी जोडला जाईल. दोन आंतरराष्ट्रीय सीमांमुळे या प्रदेशाला सामरिक महत्त्व असलेल्या या रेल्वेमार्गासाठी देशाच्या सशस्त्र दलालाही हा रेल्वेमार्ग उपयोगी ठरेल. या पुलाची लांबी १,३१५ मीटर आहे. शिवाय हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आणि कुतुब मीनारपेक्षा ५ पट अधिक उंच असेल. तसेच हा पूल १२० वर्ष अखंड राहू शकतो.
यापूर्वी असा कोणताही पूल भारतात बांधला गेला नव्हता आणि म्हणूनच या विशाल वास्तूच्या बांधकामासाठी कोणताही संदर्भ वा डिझाइन उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत, जगभरातील समान प्रकल्पांद्वारे प्राप्त झालेल्या अनुभवांवर आणि अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या तज्ञांच्या मतांवर आधारित या विशाल बांधकामाचे स्थापत्त्य तयार केले गेले. हा पूल तयार झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांची मोठी कामगिरी असेल आणि त्यांच्या अभियांत्रिकीचे एक अनोखे उदाहरण असेल.