सरकारला अनेक मुद्द्यांवर विरोधक घेरणार यामुळे अधिवेशनाला सरकार घाबरतय
मुंबई : विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे.मात्र सरकारला अनेक मुद्यांवर विरोधक घेरणार यामुळे अधिवेशनाला सरकार घाबरून कमी काळ अधिवेशन हे सरकार ठेवतय अस विरोधक म्हणत आहेत .
वर्ष 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळायला लागले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ते अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. एक वर्षांनी पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करावा लागला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत सरकारकडे याची उत्तर ही नाही त्यामुळे सरकारउत्तर अधिवेशन काल कमी करत टाळण्यासाठी बघत आहे असं विरोधक म्हणत आहेत.
महा विकास आघाडी सरकारला सत्तेत आल्यापासून शिवसेना मंत्री संजय राठोड, धनंजय मुंडे प्रकरण, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात असलेले विविध समस्या यांचा सामना करावा लागला आहे.त्यामध्ये सरकारने फार घोटाळे आणि गैरव्यवहार केले आहेत असा आरोप विरोधक करत आहेत. या सरकारला राज्य नीट चालवता येत नाही आहे विरोधकांचा प्रश्नांची देखील त्यांच्याकडे उत्तर नाहीत त्यामुळे अधिवेशनाच कामकाज जास्त करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.