सरकारची भूमिका सकारात्मक पण अंतिम निर्णय कर्मचारीच घेतील

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया

    24-Nov-2021
Total Views | 115

darekar pravin _1 &n
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर : एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाबद्दल सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्यांचे मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो. परंतु एसटीच्या संपाबाबचा अंतिम निर्णय हा कर्मचारीच घेतील अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने कबूल केले की विलीनीकरणाच्या संदर्भात समितीचा निर्णय आल्यावर त्याबाबत भूमिका घेण्याची मानसिकता दाखवली आहे. कारण न्यायालयाने समिती केली आहे. त्यादृष्टीने परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकारात्मक भाष्य केले आहे.
हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या आंदोलनाला पाठिब्यांची भूमिका घेतली होती, हे आंदोलन भाजपाचे नव्हतं, परंतु शंभर टक्के भाजपने या आंदोलनाला ताकद दिली, ही वस्तुस्थिती आहे आणि मी पहिल्या दिवसापासून आपण या आंदोलनाचा साक्षीदार व घटक आहे. पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे की, आंदोलन कर्मचाऱ्यांचे आहे. या आंदोलनाची दिशा व हे आंदोलन कशा पद्धतीने होईल, कुठे थांबेल हे कर्मचारी सांगतील तसे होईल. म्हणूनच आज चर्चेला जात असताना केवळ गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत गेले नाहीत तर त्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी गेले होते असेही दरेकर यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121