पितृपक्ष भोंदूगिरी : पुत्रप्रेम?

    17-Oct-2021   
Total Views | 326

UT _1  H x W: 0
 
 
 
 
पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी,” असे ‘बेस्ट सीएम’ उद्धव ठाकरे यांचे म्हणणे. पण, “वडिलांना वचन दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो,” असेही ते म्हणतात. आता त्यांचेच शरद काका असे म्हणाले की, “उद्धव राजी नव्हते. पण, मी हात वर करून त्यांना मुख्यमंत्री बनवले.” आता काय खरे, काय खोटे, देवच जाणे किंवा या दोघांच्याही सुप्रिमो सोनियादेवी जाणोत. तर उद्धव ठाकरे यांनी पितृपक्षाला भोंदूगिरी संबोधून तथाकथित पुरोगाम्यांना आनंदाच्या उकळ्या फुटण्याची सामग्री उपलब्ध करून दिली. यावर काही लोकांचे म्हणणे की, ऐन नवरात्रीमध्ये बंद करून हिंदूंना त्रास देण्याची नामी शक्कल लढवणार्‍यांकडून दुसरे काही अपेक्षित नाही. देशात सध्या हिंदू समाजाने (अपवाद वगळून) त्यांचे निविर्र्वाद नेतृत्व व्यक्ती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघटनात्मकरीत्या रा.स्व.संघाला बहाल केले आहे. त्यामुळे उरला सुरल्या गटाला आपल्याकडे खेचण्यासाठी हिंदूविरोधी विधाने केलीच पाहिजेत, यासाठी तर उद्धव यांनी हे विधान केले असेल का? ब्राह्मण आहोत सांगणारे राहुल गांधी खुशाल म्हणतात की, लोक मंदिरात मुलींना छेडायला जातात. तसेच मराठमोळ्या शरदकाकांची मुस्लीमप्रेमी अशी प्रतिमा आहे. राहुल गांधी आणि शरदकाका यांना देश ओळखतो. त्यामुळे आपणही हिंदू श्रद्धेविरोधात बोललो की, देशभरात प्रसिद्ध होऊ, असे तर उद्धव यांना वाटत नाही ना? पण, काही लोक म्हणतात की, “राहुल यांना आलूपासून सोना बनवण्यासाठी पप्पू म्हणून देश ओळखतो, तर काँग्रेस फोडून राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला, तसेच एका युवकाने कानशिलात मारली. या दोन घटनांमुळे देश शरद पवारांना ओळखतो.” तर काही लोक असेही म्हणतात की, “ज्यांच्यामुळे आपण जन्माला आलो, ज्यांच्यामुळे आपण आयुष्यात सर्वकाही मिळवू शकलो, अशा पूर्वजांचे स्मरण करणे ही भोंदूगिरी वाटणार्‍या उद्धव यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेऊ नये. कारण उद्धव यांचे जे काही अस्तित्व आणि सत्तास्थान आहे ते केवळ त्यांच्या पितरांमुळेच. पितृपक्षाला भोंदूगिरी मानणारे उद्धव जनतेच्या पितरांसोबतच स्वतःच्या पितरांचाही अपमान करत आहेत.” मात्र. लोकांच्या भावना देशभरात ओळख मिळवण्याच्या नादात महाराष्ट्रातच सत्तास्थानी पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या पक्षाच्या सर्वेसर्वा उद्धव यांना हे कळणारच नाहीत. तसेच पितृपक्ष भोंदूगिरी आहे, तर मग आंधळे पुत्रप्रेम काय आहे?
 
 

सोनियांचा आतला आवाज

 
 
 
 
मीच पूर्णवेळ अध्यक्ष आहे, असे मला सांगावे लागते. काय करू आतला आवाज आहे हा. माझा आतला आवाज खूप प्रसिद्ध आहे. काय करू, माझा राजकुमार त्याच्या बुद्धीनुसार आमची राजसत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण, हे भारतातले लोकपण हुशार झालेत ना? त्यात आता सोशल मीडियावर लिहिणारे ते लोक. ते तर 24 तास काही ना काही, आमच्याबद्दल लिहितच असतात. कुठून कुठून काय काय माहिती मिळवतात. लोकांना जे माहिती नव्हते, जे दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, ते सारे सारे हे सोशल मीडियावर लिहिणारे लोक पोस्ट करतात. त्यामुळे आमचा नाइलाज झाला आहे. सत्य कळत असल्यामुळे माझा राजकुमार तरी त्यापुढे किती पुरा पडणार? मग तो पण आपल्यापरीने काहीबाही बोलतो. जसे रा.स्व.संघाने माफी मागितली, जसे सावरकरांबद्दलही बोलतो. स्वातंत्र्य लढाईत रा.स्व.संघ कुठे होता सांगा? असे प्रश्नपण विचारतो. पण, त्या कमळवाल्यांनी उत्तर देण्याआधी ती सोशल मीडियातली लोकं कुठून-कुठून बसून त्याला उत्तर देतात. लेकीची पण तीच गत. माझी राजकुमारी कशी डिट्टो सासूबाईंसारखी दिसते. पण कुणाला अप्रूप नाहीच. तिचेही म्हणणे मनावर घेतच नाहीत. दोन लेकरांमुळे मग पक्षातल्या काही लोकांना स्वप्न पडलीत की, आमच्या खानदानी पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात. पण, जिथे माझे नाव गांधी म्हणून लागले, तिथे माझ्या राजकन्येच्या राजकुमाराचे म्हणजे रेहानचे नाव रेहान गांधी म्हणून लागले. तिथेच नियतीने काँग्रेसच्या भाळी आमचे अध्यक्षपद फिक्स केले आहे, समजले का? तशी आमच्या पक्षात लोकशाही आहे. मग कुणी काहीही म्हणो. कार्यकर्त्यांचाच आग्रह असतो की, आम्ही अध्यक्ष बनावे. आम्ही म्हणजे सध्या मी किंवा राहुल. आमच्या दोघांवर काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांचे कार्यकर्त्यांचे इतके प्रेम आहेच. दुसर्‍या कुणाचे नाव त्यामुळे पुढे येतच नाही. मग आम्हीच आलटून-पालटून अध्यक्ष होतो. मला परदेशी बोलणारे, ते शरद पवार जसे खुर्चीवर एकटेच अध्यक्ष म्हणून किती वर्षे मिरवतात, तसे आमच्या पक्षात एकच जण खुर्चीवर चिकटून राहत नाही म्हटले. वाचकहो, तुम्हाला काय वाटले की, हे सगळे काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी म्हणत आहेत का? नाही, नाही. तर मला संवेदनशील नागरिक म्हणून सोनिया गांधींचा आतला आवाज ऐकू आला. तो आवाज इथे मांडण्याचा प्रयत्न केला, बस..





योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसमधल्या

काँग्रेसमधल्या 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, महत्त्वाच्या पदावर पाणी सोडलं! सांगितलं 'हे' कारण...

(Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121