राम मंदिर भूमिपूजन LIVE : मोदी अयोध्येला रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
ayodhya_1  H x


सरसंघचालक श्री मोहनजी भागवत, बाबा रामदेव यांच्यासह अनेक मान्यवर अयोध्येत दाखल!



उत्तर प्रदेश : खडतर प्रतिक्षेनंतर अखेर तो क्षण आज आला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. अवघी अयोध्या आपल्या लाडक्या प्रभू श्रीरामांच्या आगमनासाठी सजली आहे. नानाविध शास्त्रोक्त विधींनादेखील सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी हनुमानगढी येथे विराजमान बजरंगबलीच्या पूजाअर्चेनंतर श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनासाठी हनुमंताची परवानगी मागण्यात आली. त्याचबरोबर हनुमानगढीवरील शस्त्रास्त्रांचे प्रतीक ‘निशाण’चे अनेक वर्षांनंतर विधिवत पूजन करण्यात आले.


आयोध्येचा संपूर्ण परिसर ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेदाच्या वैदिक मंत्रांनी मुग्ध झाला असून, परिसरात यज्ञ-आहुतीचा दरवळ पसरलेला आहे. गेल्या ३५ वर्षांच्या आंदोलनातील समर्थकांचे, कारसेवकांचे मंगळवार दुपारनंतर पाहुण्याच्या रूपाने आगमन होत होते. सायंकाळपर्यंत बहुतांश पाहुणे मंडळी दाखल झाल्याचे ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले. सरसंघचालक श्री मोहनजी भागवत, मगहर कबीर मठाचे पीठाचार्य जितेंद्रानंद सरस्वती, बाबा रामदेव, स्वामी अवधेशानंद, चिदानंद मुनी, सुधीर दहिया, राजू स्वामी, ब्रह्मानंद स्वामी, सुरेश पटेल, रितेश डांडिया यांच्यासह देशभरातील १३५ संत-महंत भूमिपूजन कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल आहेत.
@@AUTHORINFO_V1@@