२९ वर्षांनी मोदी अयोध्येत : रामललाचे दर्शन करणारे पहिले पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
Bhoomipujan _1  
 
 
 
अयोध्या : दिल्लीहून विमानाद्वारे लखनऊला पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेर अयोध्येत दाखल झाले आहेत. रामललाचे दर्शन घेण्यासाठी परंपरेनुसार हनुमानाची पूजा सर्वात आधी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान गढी येथे पोहोचले आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज दुपारी १२.३० वाजून ३० सेकंदानी शुभमुहूर्तावर होणार आहे.
 
 
 
भाजपतर्फे दहा पैकी आठ लोकसभा निवडणूकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा अग्रस्थानी ठेवला होता. हे स्वप्न आज सत्यात उतरत आहे. सर्वात महत्वाची आणि सुंदर गोष्ट म्हणजे राम मंदिराच्या भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण इकबाल अन्सारी यांना दिला आहे. स्वातंत्र्यानंतर रामललाचे दर्शन घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भगवी वस्त्र धारण केली आहेत. रामललाचे दर्शन घेताना त्यांनी लोटांगण घालून दर्शन घेतले. त्यांच्यासह योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती आहे. मोदींनी पारिजातकाचे वृक्षारोपण केले. यापूर्वी मोदी १९९१ मध्ये अयोध्येत पोहोचले होते. त्यापूर्वी मुरली मनोहर जोशी यांनी भाजप अध्यक्ष असताना तिरंगा यात्रा काढली होती. त्यावेळी मोदी त्यांच्यासह उपस्थित होते.


@@AUTHORINFO_V1@@