सुशांतचा पोस्टमॉर्टम अहवाल देण्यास कुपर रुग्णालयाकडून टाळाटाळ!

    01-Aug-2020
Total Views | 131
sushant_1  H x


रिया चक्रवर्तीही गायब; वेगाने फिरतायत बिहार पोलिसांची तपास चक्रे!


मुंबई : सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी बिहार पोलिस मुंबईत आले आहेत. बिहार पोलिसांच्या पथकाने मुंबईतील कूपर रुग्णालयाला भेट दिली. बिहार पोलिसांनी रुग्णालयातून सुशांतसिंग राजपूत यांचा पोस्टमॉर्टम अहवाल मागविला, परंतु अद्याप त्यासंदर्भात माहिती मिळाली नाही. पोस्टमॉर्टम अहवाल देण्यास रुग्णालय टाळाटाळ करत असल्याचा दावा बिहार पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. तास दुसरीकडे, रिया चक्रवर्ती तिच्या घरातून गायब झाली आहे. बिहार पोलिस रियाविरूद्ध लुकआउट आदेश देऊ शकतात. बिहार पोलिसांनी रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


रियाचा लॅपटॉप आणि मोबाइल बंद येत आहे. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात बिहार पोलिस दररोज नवीन खुलासे करीत आहेत. यामुळे मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसात वाद सुरू झाले आहेत. रियाचे मुंबईतील उच्चपदस्थ अधिकारी आणि महाराष्ट्रातील प्रख्यात नेत्याशी चांगले संबंध आहेत, यामुळे तिचा बचाव होत असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात बिहार पोलिसांनी रियाविरूद्ध पुरावे गोळा करण्यास सुरवात केली आहे.


बिहार पोलिसांकडे रिया चक्रवर्तीविरूद्ध काही मोठे पुरावे असून, अशा परिस्थितीत तिची तातडीची चौकशी करणे आवश्यक असल्याने तिचा शोध घेतला जात आहे. रिया शुक्रवारपासून घरातून गायब असुन, फोनही बंद येत असल्याने तिच्या भोवती संशयाचा घेरा वाढत आहे. बिहास पोलिस सध्या रियाचा कसून शोध घेत आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121