दोन महिने पगार नाही ! एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
MSRTC_1  H x W:





मुंबई : कोरोनापासून खबरदारी म्हणून जिल्हाअंतर्गत एसटी सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे. याचा फटका आता कर्मचाऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमध्ये कमी झालेल्या महसुलामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याची माहिती उघड झाली आहे. अशाच एका एसटी कर्मचाऱ्याने दोन महिन्यांचा पगार न मिळाल्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. 


इस्लामपूर आगारातील एसटी मॅकेनिक अमोल माळी (वय ३५) याचा दोन महिन्याचा पगार झाला नव्हता, आर्थिक संकटात आलेल्याने साडीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. अमोल माळी यांचा पगारावरच उदरनिर्वाह सुरू होता. पत्नी मोलमजूरी करून घर चालवत होती. दोन महिने पगार नाही, लॉकडाऊनमुळे संकटात असल्यानेच जीवनयात्रा संपवली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नीसह आई, पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी, असा परिवार आहे.



@@AUTHORINFO_V1@@