मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळत असल्याच्या पावसामुळे मुंबईतील ग्रँट रोड येथील तीन मजली इमारतीचा दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. पाववाल्ला लेन या भागात असलेल्या या धोकादायक मानल्या जाणाऱ्या या इमारतीच्या एका बाजूचा भाग कोसळला आहे.
अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने या इमारतीला नोटीस बजावल्यानंतर ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे सुदैवाने कुठलीही मनुष्यहानी यात झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून संततधार कोसळत असल्याने या जीर्ण इमारतीचा भाग कोसळला असावा असे वृत्त आहे.