कोरोना मदत कार्यात ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा पुढाकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |

Amitabh Bachchan_1 &



गाजावाजा न करता, प्रसारमाध्यमांपासून दूर राहत बिग बींची समाजसेवा!


मुंबई : लॉकडाऊन असल्याने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मजुर-कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारे कामगार, मजूर यांचे खाण्याचे हाल होऊ लागले आहेत. अशा कठीण प्रसंगी महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.


अमिताभ बच्चन यांच्यावतीने एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव गरजूंना मदत करत आहेत. त्यांनी हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने दररोज शिजवलेल्या अन्नाच्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे.


अमिताभ बच्चन यांच्या या संस्थेने अरब गली, अँटोप हिल, वरळी लोटस, माहिम दर्गा, हाजी अली दर्गा, धारावी आणि सायन या भागात ही अन्न वाटप सेवा सुरु केली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी प्रसारमाध्यमांना या कामाची खबर लागू नये म्हणून याचा कुठेही गाजावाजा केला नाही. याच बरोबर त्यांनी पायी जाणाऱ्या मजुरांच्या प्रवासासाठी देखील मदत केल्याचे सांगितले जाते आहे.
@@AUTHORINFO_V1@@