हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |

mega block_1  H



मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना दिलासा
मुंबई : रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी उद्या (१५ मार्च) मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.


कुर्ला - वाशी स्थानकादरम्यान दुरुस्तीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, नेरुळ व वाशी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वाशी, पनवेल व नेरुळ स्थानकातून सीएसएमटी स्थानकासाठी सुटणाऱ्या लोकल रद्द केल्या आहेत. हार्बर मार्गावरील दुरुस्तीच्या काळात सीएसएमटी-कुर्ला-वाशी व पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. दुरुस्तीच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन व ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करण्याची मुभा दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.


पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकादरम्यान दुरुस्तीच्या काळात अप व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप व डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. विलेपार्ले स्थानकातील फलाट क्रमांक ५ व ६ या जलद लाईनवर लोकल थांबतील. तर राममंदिर स्थानकात फलाट उपलब्ध नसल्याने या स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. दुरुस्तीच्या काळात अप व डाऊन मार्गावरील काही लोकल सेवा बंद राहणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशसनाकडून सांगण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@