वारिस पठाणविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

    22-Feb-2020
Total Views | 176
waris pathan_1  




ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाकडूनही कारवाई 

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये आयोजित एका जाहीर सभेत बोलताना '१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील' असे विधान केले होते.


यापूर्वी याच वक्तव्यासाठी पठाण यांच्या वक्तव्याविरोधात मुंबई, पुण्यामध्येही तक्रार दाखल करण्यात आली होती. आता कलबुर्गी पोलिसांनीही भारतीय दंड विधानाच्या कलम ११७, १५३ (दंगा भडकावण्याचा प्रयत्न) आणि कलम १५३ ए (दोन समूहांत घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न) नुसार पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून टीका करण्यात आली. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही पठाण यांच्यावर कारवाई करत त्यांना मीडियाशी बोलण्यापासून बंदी घातली. त्यामुळे, पक्षाचे पुढचे आदेश येईपर्यंत वारिस पठाण सार्वजनिक रुपात कोणतेही वक्तव्य करू शकणार नाहीत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121