मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड : ठाकरे सरकारच्या भूमीकेकडे लक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2020
Total Views |

Uddhav Thackeray Metro_1&


मुंबई : आरेतील मेट्रो कारशेडसाठी झाडांची तोड केल्यानंतर आता मेट्रो स्थानक आणि मार्गात येणारी तब्बल ५०८ झाडे हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. यात १६२ झाडे मुळापासून कापण्यात येणार असून ३४६ झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत. याचा प्रस्ताव शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते याकडे वृक्षप्रेमी आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
 
भाजप-शिवसेना युतीच्या काळात आरेतील मेट्रो कारशेडसाठी झाडे कापण्यात आली तेव्हा पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि वृक्षप्रेमी संस्था आक्रमक झाल्या होत्या. काही संस्थांनी निदर्शनेही केली होती. वृक्ष प्राधिकरणात प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला तेव्हा शिवसेनेने थयथयाट केला होता. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला धमकी देण्यात आली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आरे वसाहतीमधील झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली होती.
 
आता पुन्हा मेट्रो प्रकल्पासाठी ५०८ झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यावेळी शिवसेना विरोध करणार, की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीला परवानगी देणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. राज्यात आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने ते काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
              अशी कापावी लागणार झाडे
  • अंधेरी डी. एन. नगर ते ओशिवरा नाला मेट्रो २ साठी ३२ झाडे कापावी लागणार, तर 90 झाडे पुनर्रोपित करावी लागणार.
  • गोरेगाव आणि बांगूरनगर मार्गात स्टेशनच्या बांधकामात आडवी येणारी २९ झाडे कापावी लागणार आणि ८५ झाडे पुनर्रोपित करावी लागणार.
  • कांदिवली पश्चिम भागात येथील लालजीपाडा ते महावीरनगर दरम्यान ५३ झाडे कापावी लागणार आणि २१ झाडे पुनर्रोपित करावी लागणार.
  • दहिसर पूर्व ते डी. एन. नगर दरम्यानची ६४ झाडे कापणे आणि ३७ झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.
  • लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो ११ झाडे कापावी लागणार आणि ८६ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@