तुम्ही लॉकडाऊनमध्ये यातले कोणते चॅलेंज पूर्ण केलेत?

    30-Dec-2020
Total Views | 94

lockdown_1  H x


वाचा सोशिअल मिडीयावर गाजलेल्या 'या' ५ चॅलेंजबद्दल




मुंबई: कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन लागला आणि सगळेच जण घरात अडकून पडले. आणि मग दिवसरात्र घरी बसून काय करायचं, हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला. मग मोकळा वेळ घालवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही क्लृप्त्या शोधत होताच. आणि त्यातूनच काही नवी चॅलेंजेस समोर आली.
सरत्या वर्षात प्रत्येकजण आपण वर्षभरात काय चांगलं आणि स्मरणीय केलं, हे आठवत असतो आणि लिहून ठेवत असतो. तुम्ही म्हणाल २०२० या वर्षात आठवावं किंवा लिहून ठेवावं असं काही नाही. पण याच मोकळ्या वेळेत सोशिअल मिडीयावर सगळ्यांसाठी विरंगुळा म्हणून काही चॅलेंजेस करण्यात आली होती. यानिमित्ताने तुम्हीसुद्धा आठवून पहा, की यातली कोणती चॅलेंजेस पूर्ण करू शकलात?
१. डल्गोना कॉफी:

dulgona coffee_1 &nb
संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात प्रसिद्धीच्या शिखरावार पोचलेले चॅलेंज म्हणजे डल्गोना कॉफीचं चॅलेंज. अगदी लहान-मोठे सगळ्यांनीच हे लॉकडाऊनमधलं सगळ्यात पहिलं आलेलं चॅलेंज घरच्या घरी केलं आणि त्याचा पुरेपूर आनंद सुद्धा घेतला.


२. ओपन हेअर्स चॅलेंज:

open hair _1  H

हे चॅलेंज दिलेल्या सगळ्या मुलींनी स्वतःचे केस मोकळे सोडून काढलेला फोटो पोस्ट करायचा होता. आणि स्वतःचा फोटो पोस्ट करत असताना, आणखी काही मैत्रिणी किंवा महिला नातेवाईकांना टॅग करायचे होते.
३. कपल चॅलेंज:
couple_1  H x W
या चॅलेंजमध्ये टॅग केलेल्या व्यक्तींनी आपल्या जोडीदारासोबातचा फोटो पोस्ट करायचे होते. यानिमित्ताने अनेक जोडप्यांचे फोटो सोशिअल मिडीयावर आपल्याला पाहता आले. लग्न झालेले, ठरलेले अशा सगळ्यांनी हे चॅलेंज स्वीकारले. पण विवाहोच्छूक किंवा लग्नाळू व्यक्ती मात्र या चॅलेंजमुळे अनेकांचे सुद्धा खात होत्या आणि मस्करीला कारणही बनल्या होत्या.
४. नथीचा नखरा:

nathicha nakhara_1 &


या चॅलेंजचा महिलावर्गाने विशेष आनंद घेतला. कारण नथ हा असंही महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे अनेकींनी अगदी जुने-जुने फोटो शोधून काढत ते पोस्ट केले. काहींनी तर खास लग्नातले नाकात नाथ घातलेले फोटो पोस्ट केले. तर काहींनी आयत्या वेळी नथ घालून काढलेले फोटो पोस्ट केले. एकंदरीत हे चॅलेंज तर गाजलंच पण त्यावरचे मीम्ससुद्धा तेवढेच गाजले.
५. पैठणी चॅलेंज:

paithani challange_1 
नथीचा नखरा या चॅलेंजप्रमाणेच पैठणीचे चॅलेंजसुद्धा महिलावर्गाने आनंदाने स्वीकारले. काहींनी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पैठणी नेसल्यावर काढलेले फोटो पोस्ट केले. तर काहींनी मात्र घरच्या घरीच या चॅलेंजची कुणकुण लागल्यावर अगदी हौसेने पैठणी साडी नेसत फोटोसेशन केले व फोटो पोस्ट केले.


अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121