अतुल कुलकर्णींची मोकळी ढाकळी भूमिका

    25-Dec-2020
Total Views | 65

atul kulkarni_1 &nbs



'सँडविच फॉरेव्‍हर' सिरीजमध्‍ये विनोदीशैली साकारणार


मुंबई: अतुल कुलकर्णी यांचे काम पाहिलेल्‍यांना कलेवरील निष्ठेबाबत आणि भूमिकेला सर्वोत्तम पद्धतीने सादर करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या क्षमतेबाबत कल्पना आहेच. परंतु त्‍यांनी आतापर्यंत विनोदीशैली साकारलेली नाही. पण त्यांच्या इतर भूमिकांसाठी प्रेक्षकांनी कायमच त्यांची प्रशंसा केली आहे. पण आता सोनी लिव्ह या वाहिनीच्या 'सँडविच फॉरेव्‍हर'मध्‍ये या ओरिजिनल सिरीजमध्ये त्‍यांची प्रेक्षकांना हसवण्याची क्षमता पाहायला मिळणार आहे. या सिरीजमध्‍ये ते निवृत्त रॉ एजंट व नैनाचे (आहाना कुमरा) वडिल व्‍ही. के. सरनाईकची भूमिका साकारणार आहेत. या सिरीजमध्‍ये ते कडक शिस्‍तीच्या व्‍यक्‍तीची भूमिका साकारत आहेत.



अतुल यांची मराठी अभिनेता म्‍हणून सुरूवात ते बॉलिवुडमध्‍ये खास उपस्थिती दर्शवण्‍यापर्यंत तसेच आता ओटीटी व्‍यासपीठांवर देखील प्रबळ उपस्थिती आहे. विविध भूमिका साकारण्‍यासोबत आता 'सँडविच फॉरेव्‍हर'मध्‍ये विनोदीशैली साकारण्‍यापर्यंत अभिनेता पुन्‍हा एकदा सर्वोत्तम अभिनयाच्‍या माध्‍यमातून त्‍याच्‍याशी संबंधित असलेला समज मोडून काढणार आहे. एका तरूण विवाहित जोडप्‍याच्‍या भोवती फिरणारे कथानक असणाऱ्या 'सँडविच फॉरेव्‍हर'चे दिग्दर्शन रोहन सिप्‍पी यांनी केले आहे.



सदर भूमिकेबात बोलताना अभिनेता अतुल कुलकर्णी म्‍हणाले की, ''एक कलाकार म्‍हणून मी माझ्या कम्‍फर्ट झोनपलीकडील भूमिका साकारण्‍याला प्राधान्‍य देतो आणि मी यापूर्वी न साकारलेल्‍या भूमिका साकारतो. या भूमिकेने मला मुख्‍य कन्टेन्टमध्‍ये कधीच न मिळालेली शैली साकारण्‍याची संधी दिली. माझ्या मर्यादांपलीकडील विविध पैलू शोधण्‍यामध्‍ये मदत करणा-या भूमिका मिळाल्‍याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. 'सँडविच फॉरेव्‍हर'मध्‍ये असे उत्तम कलाकार व टीमसोबत काम करण्‍याचा अनुभव अद्भुत होता. मी २५ डिसेंबर रोजी या आनंदी क्षणात प्रेक्षकांना सामावून घेण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.''


 
अग्रलेख
जरुर वाचा
‘ती’च्यावर बोलू काही... जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

‘ती’च्यावर बोलू काही... जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

(World Menstrual Hygiene Day) मासिक पाळीसारख्या संवेदनशील परंतु, अद्यापही समाजात दुर्लक्षित व संकोचाने हाताळल्या जाणार्‍या विषयावर मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने संवाद घडवून आणण्यासाठी ’सेवा सहयोग फाऊंडेशन’ आणि 'महानगर गॅस लिमिटेड'च्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प आयोजित बुधवार, दि. २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ‘ती’च्यावर बोलू काही...’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121