मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशामुळे अनेक राजकीय घडामोडी नाट्यमयरित्या घडत आहेत. खडसेंच्या प्रवेशामुळे त्यांना मंत्रीपद द्यावे लागणार आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड यांना एक पाऊल मागे घ्यावे लागणार आहे का याबद्दलही चर्चा राजकीय सुरू आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची बैठक पार पडली. अचानक झालेल्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे.
जितेंद्र आव्हाड हे पवारांची आज्ञा पाळणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पवार खडसेंच्या प्रवेशानंतर आव्हाडांना दिलेला आदेश पाळणार का ? खडसेंसाठी एक पाऊल मागे जाणार का याकडे आता पक्ष आणि संपूर्ण राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे. गुरुवारपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकांचा वेग वाढला आहे. मंत्रालयात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता आव्हाड आणि पवार यांच्या भेटीमुळे नव्या चर्चा रंगल्या आहेत.