खडसेंचा भाजपला रामराम : मनगटावर 'घड्याळ' बांधणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2020
Total Views |
Eknath Khadse_1 &nbs
 


एकनाथ खडसेंचा भाजपतून राजीनामा

 
 
जळगाव : माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप सदस्यद्वाचा अखेर राजीनामा दिला. खानदेशातील एक लढवय्या नेता आणि ओबीसी समाजाचे नेते, अशी ओळख त्यांनी निर्माण केली. भाजपच्या राज्यातील पक्षविस्ताराच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्याविरोधात खोटे खटले दाखल करण्यात आले, त्यामुळे माझा राजीनामा घेणे, हा माझ्यासाठी अत्यंत बदनामीकारक होते, त्यामुळे माझा नाईलाज झाला. या सगळ्यात मी चार वर्षे काढली, असे खडसे म्हणाले.
 
 
 
माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे माझ्या कुटूंबाला त्रास सहन करावा लागला, असे ते म्हणाले. माझ्या मागे कार्यकर्त्यांची फौज आहे. लोकांचे आशीर्वाद आहे, त्यांच्या भरवशावरच हा मी निर्णय घेतला आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आपली तक्रार देवेंद्रजींविरोधात आहे. माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल करण्यात आला यामुळे मला वेदना झाल्या, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यातून माझी निर्दोष मुक्तता झाली आहे, मला पद न मिळाल्याचे दुःख नाही, जे काही पक्षाने दिले ते मी मेहनतीने मिळवले आहे, असेही खडसेंनी सांगितले.
 
 
रक्षा खडसे भाजपतच राहणार
 
एकनाथ खडसे यांना खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार का याबद्दल हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे. मी भाजप सोडण्याचा निर्णय स्वतः घेतला आहे, असेही ते म्हणाले.
 
 
भाजपची भावनिक साद 
 
खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, अशी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रीया दिली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मा. पाटील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
@@AUTHORINFO_V1@@