इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळले ; १८० प्रवासी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : युक्रेनचे प्रवासी विमान इराणची राजधानी तेहरानजवळ कोसळल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे. तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळाजवळ विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील कर्मचाऱ्यांसह सर्व १८० जणांचा मृत्यू झाला आहे. बोईंग कंपनीचे विमान उड्डान घेतल्यानंतर थोड्याच वेळात तेहरानच्या परांद या भागात कोसळले.

 

युक्रेनचे आंतरराष्ट्रीय विमान फ्लाईट ७५२ स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.१५ ला तेहरान विमानतळावरून उड्डान घेणार होते. मात्र, एक तास उशिराने विमानाने उड्डान घेतले होते. युक्रेनची राजधानी कीव येथील बोरीसपील विमानतळावर ते उतरणार होते, मात्र, उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात विमान कोसळले. इराणकडून इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याच्या काही तासानंतर ही दुर्घटना झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@