उकिरड्यावरचे गाढव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |

Veer Savakar _1 &nbs




स्वत:ची रेघ मोठी करण्याची हिंमत आणि वकूब नसला की इतरांचा द्वेष, अपमान, मानहानी करण्याशिवाय संबंधितांना गत्यंतर नसते. काँग्रेसचेही तसेच झाले असून देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकरांचे अतुलनीय, महनीय योगदान कसे नाकारावे वा डागाळावे, हा प्रश्न त्या पक्षासमोर आ वासून उभा असतो.



उकिरडे हुंगायची लायकी असलेले गाढव, जन्मभर तेच घाणेरडे काम निर्लज्जपणे करत असते. परंतु, ते स्वत: जोपर्यंत घाणीत गडाबडा लोळून अंग चिखलाने बरबटून घेते तोपर्यंत ठीक. मात्र, त्याने तोच चिखल इतरांवर उडवायला सुरुवात केली की, त्या गाढवाच्या पार्श्वभागावर पोकळ बांबूचे दणके बसल्याशिवाय राहत नाही. देशाच्या राजकारणात सध्यातरी काँग्रेस पक्षाची अवस्था इथे वर्णन केलेल्या गाढवाहून निराळी नाही. विशेष म्हणजे, काँग्रेसला आपले गाढवपण मिरवण्याची हौस सातत्याने वाटत असते आणि त्या हौसेच्या ज्वरातच त्या पक्षाचा मेंदू गुडघ्यापर्यंत सरकतो. तथापि, ज्यांचा मालकच राष्ट्रीय विदूषक, त्या पक्षाची स्थिती अशीच होणार, त्यात काही आश्चर्यही नाही, म्हणा!


नुकतीच वर उल्लेखलेली सर्वच विशेषणे सार्थ ठरवत काँग्रेसने आपल्या अकलेची दिवाळखोरी मांडत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामीचा अधिकृत ठेका स्वत:कडे घेतला. मध्य प्रदेशातील अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर’ नावाने पुस्तक वितरित करून काँग्रेसने स्वातंत्र्यवीरांचाच नव्हे, तर स्वातंत्र्यवीरांना प्रमाण मानणार्‍या शेकडो, हजारो, लाखो क्रांतिकारकांचा अवमान केला. ज्या नरसिंहाने रणचंडीस शीरकमलांच्या माळा अर्पण केल्या, त्या सावरकरांचे नथुराम गोडसेशी समलैंगिक संबंध होते, अशी खोटारडी व बनावट माहिती प्रसिद्ध करत काँग्रेसने आपल्या विकृत व गलिच्छ मानसिकतेचा परिचय करून दिला. अर्थात स्वत:ची रेघ मोठी करण्याची हिंमत आणि वकूब नसला की इतरांचा द्वेष, अपमान, मानहानी करण्याशिवाय संबंधितांना गत्यंतर नसते. काँग्रेसचेही तसेच झाले असून देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकरांचे अतुलनीय, महनीय योगदान कसे नाकारावे वा डागाळावे, हा प्रश्न त्या पक्षासमोर आ वासून उभा असतो. त्याच प्रश्नाच्या तापाने फणफणलेल्या काँग्रेसच्या कलेवरात सावरकरविरोधाचे विषाणू निपजतात नि त्याच्या सडक्या मनोवृत्तीतून नासक्या, कुजक्या कल्पना फेर धरून धुडगूस घालू लागतात. मात्र, कितीही घासली तरी, काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाने एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवावी की, वठलेल्या झाडाच्या फांद्यांवर बसून शिटणार्‍या कावळ्यांना राजप्रासादाच्या शिखरावर बसलेल्या गरुडाची सर कधी येत नसते, भ्रष्ट बुद्धीतून उडणार्‍या शिंतोड्यांमुळे महासागराला आव्हान देणार्‍याचे शौर्य कधी माखत नसते आणि देशाची चिंता सोडून विजनवासात सुखोपभोगात रममाण होणार्‍यांसमोर मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी घरादाराचा होम करणार्‍याची तुलना होत नसते.


दरम्यान
, काँग्रेसचा स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधातला विखार आजचा नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच (व त्याआधीही) काँग्रेसने सावरकरांना आपले राजकीय, वैचारिक विरोधक नव्हे तर शत्रूच मानले. काँग्रेसच्या या दुश्मनीचे कितीतरी दाखले इतिहासाच्या पानापानांवर ठायी ठायी पाहायला मिळतील. त्याला कारणही तसेच आहे. सावरकर म्हणजे राष्ट्रप्रेमाचे, राष्ट्रभक्तीचे व राष्ट्रवादाचे सर्वोच्च प्रमाण! हिंदुत्वाचे, हिंदू संघटनाचे नि हिंदूहिताचे पुरस्कर्ते म्हणजे स्वातंत्र्यवीर. मातृभूमीविषयक उदात्त, उत्कट, उन्नत विचारांचे प्रतीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! मात्र, ज्यांनी राजकारणात व सत्ताकारणात तोंडी लावण्यापुरताच या गोष्टींशी संबंध ठेवला, त्यांना असे सावरकर कसे मानवतील, कसे पचतील, कसे रुचतील? म्हणूनच काँग्रेसने सातत्याने सावरकरांच्या प्रतिमाहननाचे उद्योग केले.


सावरकरांना विरोध करून काँग्रेसने मुस्लीम मतपेढी सांभाळली व जोपासलीदेखील
. परंतु, मोदी-शाहंच्या राज्यात मुस्लीम समाजही भाजपला पूरक वागू लागल्याने काँग्रेस बिथरली. ज्या जातीयवादाच्या बळावर सत्तरेक वर्षे हा देश आपल्या कह्यात ठेवला, त्या काँग्रेसने तसे होत नाहीसे पाहून चिडणे, संतापणे साहजिकच. आताचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामीमागचा काँग्रेसचा हेतू त्याच मालिकेतला एक भाग. भाजपवर निशाणा साधण्यासाठी काँग्रेसने ‘वीर सावरकर’ पुस्तक छापून डॉमिनिक लॅप्रिएर व लॅरी कॉलिन्स यांच्या ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ पुस्तकातील संदर्भाने सावरकरांबद्दल अश्लाघ्य माहिती प्रकाशित केली. पण, काँग्रेस तेवढे करूनच थांबली नाही, तर आपला जातीयवादाचा खुंटा बळकट करण्यासाठी कालबाह्य गोष्टींचाही उल्लेख केला. सावरकरांनी हिंदू पुरुषांना अल्पसंख्य स्त्रियांवर बलात्कारासाठी प्रोत्साहन दिले, या अर्थाची प्रश्नोत्तरे काँग्रेसने आपल्या पुस्तकातून प्रसिद्ध केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नाझीवादी व फॅसिस्टवादी संघटना असल्याचे तथ्यहीन दावे केले. त्याला संदर्भ जातीयवादाचाच आहे. देशात गेल्या काही काळापासून काँग्रेस व डाव्यांनी पाळलेल्यांकडून नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेवरून हिंसाचार माजवला गेला. खोटीनाटी माहिती देऊन, अफवांचे बार उडवत काँग्रेस व डाव्यांनी मुस्लिमांना रस्त्यावर उतरायला भाग पाडले. जो मुस्लीम समाज तिहेरी तलाकविरोधातील कायद्यापासून श्रीराम जन्मभूमीवरील न्यायालयीन निकालावेळीही शांत होता, त्याने आता तरी आमच्या स्वार्थासाठी अराजक निर्माण करावे, असा काँग्रेस व डाव्यांचा हा कावा होता. तसे झालेही, पण ते कमी म्हणून की काय काँग्रेसने हे पुस्तक छापत आगीत आणखी तेल ओतण्याची तत्परता दाखवली. परंतु, सत्ताच्युत झाल्यानंतरचा सत्ताप्राप्तीसाठीचा हा काँग्रेसी हव्यास केवळ सावरकरद्रोही, भाजपद्रोही, हिंदूद्रोहीच नव्हे, तर राष्ट्रद्रोहीही ठरतो. कारण, जळणारी काँग्रेस नसते तर सर्वसामान्यांना निवारा देणारा देशच जळत असतो.


दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपप्रचार करण्यामागचा काँग्रेसचा आणखी एक उद्देश म्हणजे देशाला स्वातंत्र्य केवळ आम्हीच मिळवून दिल्याचा अहंभाव
. गांधी-नेहरू घराण्याशिवाय व काँग्रेस पक्षाशिवाय भारत अस्तित्वातच आला नसता, हे ठसवण्याचाच हा प्रकार. अर्थात काँग्रेसने फेकलेली हाडके चघळण्यात पटाईत असलेल्यांकडून तसे लिहिले, बोलले जातेच. मात्र, ज्यांच्या पराक्रमाचे पोवाडे काँग्रेस वा त्यांनी पोसलेले छद्म इतिहासकार-पत्रकार नव्हे तर मातृभूमीचा कण न् कण गात असतो, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पुसण्याचे, बदनाम करण्याचे धाडस काँग्रेसने करू नये. कारण, सावरकरांबद्दल अर्वाच्च शब्द वापरून तसे काम करू पाहणार्‍या काँग्रेसने एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी, ती म्हणजे देशभक्त वा देशाविरोधात बोलणार्‍यांना पाहून इथल्या गवतालाही भाले फुटतात नि ते कधी काँग्रेससारख्या कृतघ्नांची दाणादाण उडवतील, हे सांगता येत नाही.

@@AUTHORINFO_V1@@