कंगनाच्या ‘पंगा’वर भारी पडतोय ‘स्ट्रीट डान्सर’

    25-Jan-2020
Total Views | 69

panga_1  H x W:



कंगनाचा ‘पंगा’ थेट वरुण-श्रद्धाच्या ‘स्ट्रीट डान्सर’शी...

मुंबई : नवीन वर्षात अनेक चित्रपट एकदिवशी चित्रपट बारीवर धडकल्याने, त्याचा परिणाम थेट त्यांच्या गल्ल्यावर झालेला दिसला. ‘छपाक’-‘तान्हाजी’ नंतर काल म्हणजेच शुक्रवारी रेमो डिसूजा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सरआणि अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित पंगाहे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. आपल्या चित्रपटांचे दोन्हीही चित्रपटांच्या टीमने दमदार प्रमोशन केले होते. सोशल मीडियावर या चित्रपटांच्या ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगलीच शर्यत पाहायला मिळाली.


या दोन्ही चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईच्या आकड्यांबाबतची चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शानिवारी माहिती दिली आहे. या माहितीनुसार कंगना राणावतच्या
पंगाचित्रपटाच्या तुलनेत स्ट्रीट डान्सरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी श्रद्धा कपूर आणि वरुण धवन यांचा मल्टीस्टारर असलेल्या स्ट्रीट डान्सरचित्रपटाने १०.२६ कोटीची कमाई केली आहे. तर, ‘पंगाचित्रपटाची कमाई फक्त २.७० कोटी एवढी झाली आहे.


मात्र या आकड्यांमध्ये आठवड्याच्या शेवटपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही दोन्ही चित्रपटांना प्रशंसा मिळत आहे. पण तिकिट खिडकीवर यापैकी कोणता चित्रपट बाजी मारेल
, हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होईल.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121