भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य

    25-Jan-2020
Total Views |
2020 _1  H x W:


दि. २६ जानेवारी, १९५० या दिवशी भारत देश प्रजासत्ताक झाला व स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात आली. तेव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी हा दिवस देशभरात ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये उलगडणारा हा लेख...


१७ नोव्हेंबर
, १९४९ रोजी आयोजित भारतीय घटना समितीच्या अधिवेशनामध्ये प्रस्तावित भारतीय राज्यघटनेचे तिसरे वाचन करण्यात आले. डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला - घटना समितीने सुचविलेली भारतीय राज्यघटना संमत करावी. या प्रस्तावावरील विस्तृत चर्चेद्वारे हा प्रस्ताव २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी समिती सभेमध्ये टाळ्यांच्या गजरात संमत केला गेला. (The Constituent Assembly took up the third reading of the Constitution on November १७, १९४९, on a motion by Ambedkar, that the Constitution as settled by the Assembly be passed. The discussion on the motion concluded on November २६ and the motion was put to vote and adopted amidst prolonged cheers.)


हा ठराव संमत केला गेला
, त्याआधी एक दिवस, म्हणजे दि. २५ जानेवारी, १९४९ रोजी घटना समितीच्या बैठकीमध्ये डॉ. आंबेडकरांनी केलेले भाषण पुढीलप्रमाणे - “२६ जानेवारी, १९५० रोजी भारत एक प्रजासत्ताक देश बनू पाहत आहे. या दिवसापासून देशातील नागरिकांना स्वतःचे, स्वतःने चालवलेले, स्वतःसाठीचे सरकार मिळणार आहे. माझ्या मनामध्ये एक शंका जरूर उद्भवत आहे - या देशाच्या सार्वभौम राज्यघटनेचे पुढे काय होईल? दुसरी शंका - हा देश सार्वभौम राज्यघटना जपू शकेल की परत हरवून बसेल? या दोन्ही शंका माझ्या मनात काहूर उठवत आहेत.”


2020 _1  H x W:

 

(On २६th of January १९५०, India would be a democratic country in the sense that India from that day would have a government of the people, by the people and for the people. The same thought comes to my mind. What would happen to her democratic Constitution? Will she be able to maintain it or will she lose it again? This is the second thought that comes to my mind and makes me as anxious as the first.)

महात्मा गांधींनी घटना तयार होण्याअगोदर लोकस्वराजमध्ये लेख लिहिला होता तो पुढीलप्रमाणे - “मी अशा राज्यघटनेसाठी प्रयत्नशील आहे जी राज्यघटना हिंदुस्तानला गुलामी आणि आश्रित अवस्थेमधून मुक्त करणारी असेल. माझा प्रयत्न अशा भारतासाठी असेल, जेथे सर्व जातीजमाती एकोप्याने राहतील. सर्व वंशाचे लोक जेथे खेळीमेळीने राहतील. जेथे अस्पृश्यता आणि मादक पदार्थ यांना स्थान राहणार नाही. स्त्री-पुरुषांना समान हक्क राहतील. देशातील सर्व लोक शांतीने आणि एकोप्याने राहतील. जेथे लहानात लहान लष्कर ठेवलेले असेल. हा माझ्या स्वप्नांतील भारत असेल. यापेक्षा कमीमध्ये मी समाधानी नसेन. मला वाटते हिंदुस्थानचे ध्येय यापेक्षा वेगळे नसेल.”



 

२६ जानेवारी, २०२० रोजी भारत देश त्याचा ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दुसर्‍या वेळी पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकार आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात केवळ पहिल्या १०० दिवसांमध्ये मुस्लीम महिलांच्या ‘तिहेरी तलाक’ प्रथेला सुरुंग लावण्यात आला, तर याच १०० दिवसांमध्ये ‘कलम ३७०’ची बर्लिन भिंतही उद्ध्वस्त करण्यात आली. त्रिवार तलाक ‘तिहेरी तलाक’ ही प्रथा खुद्द पाकिस्तान, इराण, इराक आणि सीरिया वगैरे १९ मुस्लीम देशांमधून संपुष्टात आली आहे.

आम्ही भारतीय मात्र मुस्लीम मनाचा बागुलबुवा नाचवत कच खात आहोत. आपणही मुस्लीम महिलांच्या कल्याणार्थ ही दुष्ट प्रथा मोडीत काढली पाहिजे, हा युक्तिवाद नवे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेला ऐकवला तेव्हा लोकमान्यांच्या साहसी जीवनाची आठवण वर्तमान मोदी सरकारने जागविली असे म्हटले पाहिजे. ७० वर्षांचा एक फार मोठा कलंक आपण धुऊन टाकला व पाठोपाठ काश्मीरची वेगळी चूलही तोडून-मोडून टाकण्यात याच मोदी सरकारने फार मोठे ऐतिहासिक साहस दाखवले. भारतात राहायचे की नाही, हे कोणताही एक प्रांत किवा लोकसमूह ठरवू शकत नाही. भारताचा भाग्यविधाता भारतच आहे व म्हणूनच काश्मीरचा स्वतंत्र दर्जा निर्धाराने रद्द करण्यात आला याचे स्वागत सर्वच सुज्ञ जनांनी केले.

आपल्याला हे माहीत आहे का, कलाचार्य नंदलाल बोस व शांतिनिकेतनमधील अन्य कलाकारांनी सुशोभित केलेली राज्यघटनेची एक कलात्मक प्रत छापली गेली आहे? दिल्लीचे रायजादा ब्रिजबिहारी नारायण यांचे सुपुत्र प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी इंग्रजी कर्सिव्ह लिपीमध्ये एकहाती तयार केलेली, त्याकाळच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांच्या सह्या असलेली ही अत्यंत किंमती प्रत डेहराडूनच्या ’सर्व्हे ऑफ इंडिया’ सरकारी छापखान्यामध्ये विशेष प्रकारे छापून घेतली होती. या प्रतीचे प्रत्येक पृष्ठ भारतीय ढंगाच्या सुंदर वेलबुट्टी काठाने, अनेकरंगी छपाईने सुशोभित आहे. प्रत्येक प्रकरणाचा सुरुवातीला भारताचा सांस्कृतिक इतिहास दर्शविणारी, नामवंत कलाकारांनी रेखाटलेली रेखाचित्रे आहेत.


 

भारतीय राज्यघटनेची रचना अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध झाली आहे. भारतीय राज्यघटनेचा कच्चा मसुदा दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी घटना समितीकडून स्वीकारला गेला. घटना समितीने १६६ दिवस काम केले. भारतीय राज्यघटनेचा पक्का मसुदा तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने व १८ दिवस एवढा कालावधी लागला. दि. २६ जानेवारी, १९५० पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली. सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली, रामायण, महाभारत व इतर ऐतिहासिक प्रसंगचित्रे असलेली, भारतीय राज्यघटनेची सचित्र प्रतदेखील आहे, हे आपल्या देशातील अनेकांना माहीत नसेल. घटना समितीच्या सदस्यांनी भारतीय राज्यघटनेच्या कच्च्या मसुद्यावर स्वाक्षर्‍या केल्यानंतर, राज्यघटनेची सुंदर हस्ताक्षरामधील सचित्र आवृत्ती तयार करण्याचा निर्णय घेतला.

प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी राज्यघटनेच्या इंग्रजी आवृत्तीचे सुंदर हस्ताक्षरात लेखन केले. त्यांनी हे काम २८ नोव्हेंबर, १९४९ ते एप्रिल १९५० या पाच महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले. सुंदर हस्ताक्षरात लिहून तयार झालेली पाने सुशोभित व चमकदार करण्याचे काम शांतिनिकेतमधील सुप्रसिद्ध कलाकार नंदलाल बोस यांनी चार वर्षांमध्ये पूर्ण केले. नंदलाल बोस यांनी मोहेंजोदारो कालखंडापासून सुरू होणार्‍या भारतीय इतिहासातील, वैदिक कालखंडातील आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रसंगांची रेखाचित्रे काढली. जवाहरलाल नेहरू यांच्या सूचनेबरहुकूम सदर सचित्र आवृत्तीच्या पानांवर चारही बाजूंच्या मोकळ्या जागांमध्ये खर्‍या सोन्याचा मुलामा देण्यात आला. २११ पानांमध्ये कला आणि इतिहास यांचे एकत्रित सादरीकरण करण्याच्या कौशल्यपूर्ण कामगिरीसाठी त्या काळात नंदलाल बोस यांना २१ हजार रुपये एवढ्या रकमेचा मोबदला देण्यात आला. सदर मूळ प्रतीवर घटना समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

सध्याच्या लोकसभा सचिवालयापूर्वी अस्तित्वात असणार्‍या पार्लमेंट सचिवालयाने घटना समितीकडून या प्रकल्पाचा ताबा दि. २६ जानेवारी, १९५० रोजी घेतला. तेव्हापासून सदर अद्भुत दस्तावेज पुढील पिढ्यांसाठी मोलाचा ठेवा म्हणून जतन करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेची सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली, सुशोभित केलेली सचित्र मूळ प्रत नवी दिल्ली येथे संसद भवनात ग्रंथालय कक्षामध्ये पहिल्या मजल्यावर एका स्टील बॉक्समध्ये ठेवण्यात आली आहे.


2020 _3  H x W:

 

सदर आवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली रेखाचित्रे पुढीलप्रमाणे आहेतः

. मोहेंजोदारो कालखंड - मोहेंजोदारो शिक्क्यांवरील सजावट

. वैदिक कालखंड - वैदिक आश्रमामधील (गुरूकुल) दृश्य

. पौराणिक कालखंड - रामायणामधील प्रसंग (लंकेवर विजय व सीतेची प्राप्ती)

. पौराणिक कालखंड - महाभारतामधील प्रसंग (अर्जुनाला गीतोपदेश करताना श्रीकृष्ण)

. महाजनपद व नंद कालखंड - गौतम बुद्धाच्या जीवनामधील प्रसंगाचे चित्र

. महाजनपद व नंद कालखंड - महावीराच्या जीवनामधील प्रसंगाचे चित्र

. मौर्य कालखंड - सम्राट अशोकाद्वारे भारत व इतर देशांमध्ये बौद्धधर्माचा प्रसार दर्शविणारा प्रसंग

. गुप्त कालखंड - गुप्तकलेमध्ये रेखाटलेला प्रसंग, त्याचा विविध काळामध्ये झालेला विकास

. गुप्त कालखंड - विक्रमादित्याच्या राजदरबारामधील प्रसंगाचे चित्र

१०. गुप्त कालखंड - प्राचीन विद्यापीठांपैकी एक नालंदा विद्यापीठाचे रेखाचित्र

११. मध्ययुगीन कालखंड - ओडिशा येथील शिल्पकलेमध्ये दर्शविलेला प्रसंग

१२. मध्ययुगीन कालखंड - नटराजाची प्रतिमा

१३. मध्ययुगीन कालखंड - महाबलीपुरम येथील शिल्पांमध्ये दर्शविलेला प्रसंग (भगिरथाचे प्रायश्चित्त आणि गंगावतरण)

१४. मुस्लीम कालखंड - अकबर व मुघल स्थापत्त्यशास्त्र

१५. मुस्लीम कालखंड - शिवाजी व गुरू गोविंद सिंग

१६. ब्रिटिश कालखंड - टिपू सुलतान व राणी लक्ष्मीबाई (ब्रिटिश आक्रमणाविरुद्ध लढा)

१७. भारताचा स्वातंत्र्यलढा - राष्ट्रपित्याचे चित्र (गांधीजींची दांडीयात्रा)

१८. भारताचा स्वातंत्र्यलढा - शांततेचा प्रसार करणारे बापूजी (गांधीजींची दंगलपीडित नौआखालीमधील पदयात्रा)

१९. भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी चळवळ - बाहेरून हल्ला करून भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याकरिता नेताजी सुभाषचंद्र व इतर देशभक्त प्रयत्न करतांना

२०. नैसर्गिक - हिमालयामधील दृश्य

२१. नैसर्गिक - वाळवंटातील दृश्य

२२. नैसर्गिक - समुद्रामधील दृश्य

 

2020 _4  H x W:



 
 

ही रेखाचित्रे पाहिल्यावर या हस्तलिखित आवृत्तीमागील पार्श्वभूमी समजून घेण्याची उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. ही रेखाचित्रे भारतीय राज्यघटनेच्या सचित्र आवृत्तीमध्ये का समाविष्ट करण्यात आली? यामागील उद्देश काय होता? मिश्र संस्कृतीवर विश्वास असणार्‍या व अल्पसंख्याकांच्या बाबतीत अतिउत्साही व काळजी वाहणार्‍या जवाहरलाल नेहरू व इतर घटनानिर्मात्यांनी या चित्रांचा समावेश सदर आवृत्तीमध्ये का केला? कारण, भारतीय राज्यघटनेची आधारभूत/मूलभूत आवृत्ती म्हणजे केवळ राज्य चालविण्यासाठी व बंदोबस्त राखण्यासाठी उपयुक्त अशा विविध कायद्यांचा सारांश होता.

या दस्तावेजामध्ये कोठेही आपल्या दिव्य परंपरेविषयी व नागरी संस्कृतीविषयी उल्लेख नव्हता. कदाचित घटनानिर्मात्यांची सांस्कृतिक जाणीव अधोरेखित करण्यासाठी या रेखाचित्रांचा समावेश सदर आवृत्तीमध्ये केला असावा. नेहरूंचा हा अमूल्य वारसा काय आहे? त्यांचे भगवद्गीतेबद्दल काय विचार आहेत? नेहरूंना इतिहासाबद्दल सखोल ज्ञान होते. अहमदनगर तुरुंगामधून लिहिलेल्या, ’डिस्कव्हरी ऑफ इंडियाया पुस्तकामधून त्यांनी भारताच्या प्राचीन व महान संस्कृती वारशाबद्दल गौरवपूर्ण शब्दांमध्ये लिहिले आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये पं. नेहरूंनी भगवद्गीतेबद्दल काढलेले उद्गार असे आहेत- “गीतेचा संदेश हा कुठल्याही जाती किंवा धर्माला उद्देशून केला नसून तो संपूर्ण मानवसमाजासाठी आहे. यामुळे गीतेतील संदेशाचा अनेक निरनिराळ्या मतांच्या लोकांनी स्वीकार केला आहे. याच्यामध्ये असे काही वैशिष्ट्य आहे की गीतेचा विचार कधीच कालबाह्य होत नसून नित्यनूतन आहे.”

- मधू देवळेकर

(लेखक माजी आमदार आहेत.)

९८१९३३१०७१

[email protected]

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.