निरव मोदीच्या अडचणीत वाढ ; १७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2019
Total Views |


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायदंडाधिकारी न्यायालयात व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. नीरव मोदीच्या विरोधात भारतात मनी लॉड्रिंग आणि पीएनबी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असून तो सध्या लंडनमध्ये आहे.

 

नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून त्याने भारतातून पलायन केले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वाँड्सवर्थ तुरूंगात आहे. तेथील कायद्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यानंतर ताब्यातील कालावधी वाढवण्यासाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले जात आहे. या अगोदर मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी असे संकेत दिले होते की, दोन्ही पक्ष त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्तावित पाच दिवसांच्या सुनावणीवर लवकरच तयार होऊ शकतात.

@@AUTHORINFO_V1@@