नवी दिल्ली : भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधूने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतपदावर आपले नाव कोरले आणि इतिहास रचला. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहराला २१-७, २१-७ अशा सेटमध्ये हरवत विजेतेपदाला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील घेतली. त्यांनी पी.व्ही.सिंधूची भेट घेऊन तिचे कौतुक केले.
"पी. व्ही. सिंधू आपल्या देशाचा अभिमान आहे. सिंधूने बॅडमिंटनच्या स्पर्धेत जगज्जेतेपदावर नाव कोरल्याचा आनंद झाला आहे." असे कौतुक करत पंतप्रधानांनी शाबासकीची थाप दिली. तिला भविष्यातल्या चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाने सिंधूला दोनवेळा हुलकावणी दिली होती. मात्र मागील अपयशावर मात करीत सिंधूने अखेर जेतेपदावर आपले नाव कोरले.