योगामधील अनेक उपक्रमांमुळे, तिच्या फिटनेस रुटीनमुळे आणि डान्स रिऍलिटी शोमुळे सतत चर्चेत असणारी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ही तब्ब्ल १३ वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे. सब्बीर खान दिग्दर्शित 'निकम्मा' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पडण्यास ती येत आहे. सोशल मीडियावरून तिने याविषयी शेअर केल्यानंतर त्यावर फारा खान आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या.
Yesssssssss, it’s true! My sabbatical of 13 long years comes to an end.. I am so excited to announce that the film you will see me next in is #Nikamma ,
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) August 1, 2019
directed by sabbir24x7 (cast still being finalised) featuring… https://t.co/LrTrZs0X0H
शिल्पा शेट्टी कुंद्रा बरोबरच या चित्रपटात अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेठिया हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. शिल्पा शेट्टी २००७ मध्ये 'अपने' आणि 'लाईफ इन अ मेट्रो' अशा दोन चित्रपटांमध्ये दिसली होती त्यानंतर आता १३ वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय तिने घेतला हे ही तिच्या चाहत्यांसाठी एक उत्सुकतेची बाब असेल. 'निकम्मा' हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होईल.