सावधान; गुगल तुमचं बोलणं ऐकतंय !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2019
Total Views |



मुंबई : भिंतीलाही कान असतात हे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत. मात्र गुगलला कान कसे असू शकतात? बातमीचे हेच शीर्षक ऐकून तुम्ही नक्की बुचकळ्यात पडला असला. गुगलला कान आहेत आणि तुमच्या आजूबाजूचे तो संपूर्ण गोष्टी ऐकू शकतो. या संदर्भात नुकताच एक रिपोर्ट समोर आला असून या रिपोर्टमुळे जगभरात खळबळ माजली आहे. गुगलसाठी काम करणारा एक कॉन्ट्रॅक्टर गूगल असिस्टंटच्या माध्यमातून तुमचं बोलणं ऐकत असल्याचे बेल्जियन ब्रॉडकॉस्टर VRT NWSच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

 

या अहवालानुसार, गूगल स्पीच रिकग्नायझेशनमधील चुका सुधारण्यासाठी गूगल होम स्पीकरच्या माध्यमातून लोकांची चर्चा रेकॉर्ड केली जाते. रेकॉर्ड केलेली चर्चा गुगलच्या कॉन्ट्रॅक्टरकडे पाठवले जाते. सब कॉन्ट्रॅक्टर्सकडे काम करणारे कामगार हे रेकॉर्डिंग ऐकत असल्याचे VRT NWSने म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे, गूगल होम युजर्सनी 'Ok Google' हा वेक-अप वर्ड उच्चारला नसतानाही त्यांचे रेकॉर्डिंग केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

गुगलने या प्रकरणावर आपली बाजू मांडली. कॉन्ट्रॅक्टरने डेटा सिक्युरीटी पॉलिसीच्या नियमांचे उल्लंघन केले असून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच काही गेमिंग अ‍ॅप्स स्मार्टफोनमधील मायक्रोफोनच्या मदतीने युजरच्या भोवतालाची माहिती जाहिरातदारांना विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यामुळे गुगल व स्मार्ट गॅजेटच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@