अयोध्या प्रकरणाची सुनावणी २५ जुलैपासून !

    11-Jul-2019
Total Views | 39



नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाची ताबोडतोब सुनावणी करावी या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अयोध्या प्रकरणाची सुनावणी येत्या २५ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली. तसेच मध्यस्थ समितीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ समितीला आपला अहवाल २५ जुलैच्या आत सादर करण्याचे आदेश दिले.

 

अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ समिती नेमली होती. समितीमध्ये श्री श्री रविशंकर, न्या. खलीफुल्ला आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा सामावेश आहे. "मध्यस्थ समितीकडून अयोध्या प्रकरणावर काहीही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा", अशी बाजू ज्येष्ठ वकील के. परासरन यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली.

 

"या प्रकरणावर आम्ही मध्यस्थ समिती नेमली आहे. आम्ही या समितीच्या अंतिम अहवालाची वाट पाहत आहोत. त्यांना त्यांचा अहवाल सादर करू द्या. यानंतर मध्यस्थ समिती बाबत निर्णय घेतला जाईल. मध्यस्थ समिती तोडगा काढण्यास असमर्थ ठरल्यास येत्या २५ जुलैपासून अयोध्या प्रकरणावर सुनावणी केली जाईल", असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसमधल्या

काँग्रेसमधल्या 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, महत्त्वाच्या पदावर पाणी सोडलं! सांगितलं 'हे' कारण...

(Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121