अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

    03-Jun-2019
Total Views | 37

 
 

 

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय प्रेम कथेचे एक उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन. तब्ब्ल ४६ वर्षांपूर्वी याच दिवशी ते दोघे लग्नबंधनाच्या सुंदर अशा गाठित बांधले गेले. गुड्डी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुरु झालेला हा प्रेमाचा प्रवास आजदेखील अखंड सुरु आहे. गुड्डी या चित्रपटांबरोबरच अभिमान, सिलसिला, जंजीर, शोले, मिली, चुपके चुपके, कभी ख़ुशी कभी गम अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना त्यांच्यामधील केमेस्ट्रीची झलक दाखवली.

 

अभिषेक बच्चनने देखील या आनंदाच्या प्रसंगी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची दोन्ही मुले म्हणजेच अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवत आहेत. सध्या अभिषेक बच्चन त्याचा आगामी चित्रपट 'बंटी और बबली अगेन' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे तर श्वेता आपल्या नवीन फॅशन ब्रॅण्डवर काम करताना दिसत आहे.

 
 
 

अभिषेक आणि श्वेता यांच्या चित्रपट क्षेत्रातील यशस्वी प्रवासामागे अमिताभ आणि जया बच्चन यांचा मोलाचा वाट आहे. एकीकडे अभिषेक त्याच्या आगामी चित्रपटावर काम करतोच आहे आणि दुसरीकडे अमिताभ बच्चन 'ब्रम्हास्त्र' मध्ये झळकणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121