Exit Poll Effect : शेअर बाजार उसळला

    20-May-2019
Total Views | 28




मुंबई : लोकसभा निवडणुकासाठी रविवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर देशभरातील विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसून आला. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराने ८०० अंकांची उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२९ अंकांची वधारल्याने आठवड्याची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी चांगली ठरली आहे.

 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी ९६० अंशांनी वधारला. सोमवारी सेन्सेक्स ३८,८१९.६८ अंकांवर उघडला. तर निफ्टीतही २२९ अंकांची वाढ होऊन तो ११,६९१.३० अंकांवर उघडला होता. बाजारातील गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलने जास्तकरुन भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविल्याने काही बाजाराने उसळी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातही असा अंदाज दिसत होता. जर भाजपाने स्वबळावर बहुमत मिळविले, तर शेअर बाजारात आणखी उसळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

काही तज्ज्ञांनी सावध पवित्रा घेण्याचा सल्ला दिला आहे. बऱ्याचदा एक्झिट पोल चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे शेअर बाजार एक मजबूत सरकार पाहते. मात्र, निकाल लागेपर्यंत म्हणजेच २३ मेपर्यंत लोकांनी वाट पाहिली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. दरम्यान सोमवारी मात्र बाजाराने घेतलेली उसळी गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121