चेन्नई : वादग्रस्त विधानसासाठी प्रसिद्ध असलेले कमल हसन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मुघल आणि परकियांच्या आक्रमणाआधी हिंदू हा शब्द अस्तित्त्वातच नव्हता अशी गरळ त्यांनी ओकली आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे वक्तव्य कमल हसन यांनी केले होते. त्यामुळे देशभरात मोठा वादंग निर्माण झाला होता. हा वादंग थंडावण्याच्या आतच हसन यांनी 'हिंदू' शब्दावर वादग्रस्त विधान केले.
— Kamal Haasan (@ikamalhaasan) May 17, 2019
हसन यांनी तामिळ भाषेत ट्विट करत 'हिंदू' या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात आढळत नसल्याचे सांगत हा शब्द बाह्य आक्रमकांनी आपल्याला दिला असल्याचा जावई शोध लावला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर हिंदू शब्दाऐवजी स्वत:ला भारतीय म्हणून घेतले पाहिजे, असा अजब सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. कमल हसन आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे ही घटना घडली होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat