कारवार : कर्नाटकमध्ये आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू नौकेला शुक्रवारी सकाळी आग लागली. यामध्ये लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. आयएनएस विक्रमादित्य ही नौका कारवार बंदरात प्रवेश करत असतानाच नौकेच्या एका कम्पार्टमेंटमध्ये आग लागली.
ही बाब लक्षात येताच नौकेवरील लेफ्टनंट कमांडर डी. एस. चौहान यांनी शौर्य दाखवत मोठ्या शर्थीने आग नियंत्रणात आणली. मात्र, या दरम्यान ते बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना तातडीने कारवार येथील नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आयएनएस. विक्रमादित्य हे भारतीय नौसेनेतील एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये नौसेनेच्या सेवेत रुजू झाले. या नौकेवरील तीन वर्षातील हा दुसरा अपघात आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat