विनायक मेटेंची पंकजा मुंडेविरोधात भूमिका

    12-Apr-2019
Total Views |


राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना पाठिंबा जाहीर


बीड : जिल्ह्याच्या पालकमंत्री व महिला आणि ग्रामविकास मंत्री आणि शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे यांच्यातील मतभेत येन निवडणुकीच्या काळात चऱ्हाट्यावर आले आहेत. २०१४मध्ये महायुतीत सामील झालेले मेटे यांनी बीड लोकसभा मतदार संघात युती विरोधात दंड थोपाटत राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

२०१४च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधात काम केले होते, ते माझं काहीही ऐकत नसल्याने आपण राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला असल्याचे मेटे यांनी काल बीड येथील भाषणात सांगितले. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर अन्याय मी सहन करणार नाही. भाजपासोबत महाराष्ट्रात असेन पण बीडमध्ये नाही अशी भूमिका मेटेंनी घेतली आहे. यावर भाजपचे स्थानिक पदाधिकारीही आक्रमक झाले असून मेटेंची पक्षाच्या कोट्यातील आमदारकी काढून घ्यावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केली आहे. दरम्यान, मेटेंच्या या भूमिकेमुळे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121