स्टॅच्यू ऑफ युनिटीची कीर्ती 'वाढता वाढता वाढे!'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिकृती असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. या पुतळ्याला उभारून तब्बल एक वर्ष झाले आहे. यावेळी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ने १३३ वर्षांपासून उभ्या असलेल्या अमेरिकेतील 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'ला मागे टाकले आहे. गुजरातमधील या स्मारकाला दरदिवशी १५ हजारपेक्षा अधिक पर्यटक भेट देतात. तर, अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला रोज जवळपास १० हजार पर्यटक भेट देतात.

 

नोव्हेंबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये ७४ टक्क्यांनी वाढ झाली. तर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात स्टॅच्यू ऑफ युनिटीला रोज जवळपास १५,०३६ पर्यटक भेट देतात अशी माहिती सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडने दिली. तसेच, सुटीच्या दिवशी हा आकडा जवळपास २२,४३० पर्यटकांवर जातो.

 

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री होती. १८२ मीटरचा असलेला हा पुतळा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाजवळ हा बांधला आहे. २०१८मध्ये ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

@@AUTHORINFO_V1@@