स्मृती इराणींच्या तक्रारी नंतर निवडणुक आयोगाची राहुल गांधींना नोटीस

    16-Dec-2019
Total Views | 24

rahul_1  H x W:


नवी दिल्ली : 'रेप इन इंडिया' या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना केल्या आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या वक्तव्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.


राहुल यांनी प्रचार सभेदरम्यान बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. त्या वेळी मोदींवर टीकास्त्र सोडताना मोदींचे 'मेक इन इंडिया' आता भारतात 'रेप इन इंडिया' बनले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. भारतात दररोज बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचेही राहुल म्हणाले होते. त्यावर संसदेत आणि संसदेबाहेरही राहुल याचा निषेध करण्यात आला.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121