कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या १३०० जादा बसेस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |


 

मुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. ८ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीने महाराष्ट्रातील विविध बसस्थानकावरून सुमारे १३०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. दि. ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये हि जादा वाहतूक करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत.


कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रतील भाविक प्रवाशाची सोय करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदादेखील १३०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या यात्रेला विशेषतः कोकणातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची जास्त गर्दी होते. यास्तव या ५ विभागातून मुंबई-११०, रायगड-१००, सिधुदुर्ग-३०, ठाणे-३०, रत्नागिरी-१२० विशेष जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर येथे स्थानिक बसस्थानका बरोबरच चंद्रभागा नगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.




@@AUTHORINFO_V1@@