किदंबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व फेरीत दाखल

    29-Nov-2019
Total Views | 41


सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताचे किदंबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत.

 

लखनऊ येथे सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या सोन वान हो याच्याशी तर सौरभचा सामना थायलंडच्या कुणलाऊथ विटीसार्न याच्याशी होईल. त्याविषयी आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

युवा खेळाडू लक्ष्य सेनचं स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले आहे. महिला एकेरीत भारताच्या श्रृती मुदंडा आणि ऋतूपर्णा दास यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ सेटमध्ये हरवून उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर यांनी उपांत्यपूर्वफेरी गाठली आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121