पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचा अतिशय प्रामाणिक सेवक म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा लौकिक आहे. त्यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी त्यांना देण्यात आली आहे. चंद्रकांत दादा पाटील हे संघाचा निष्ठावंत सेवक असल्याची प्रचिती रविवारी पुन्हा एकदा आली. पुण्यात कोथरूडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘संभाजी’ भागाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव एमआयटी संस्थेच्या मैदानावर संपन्न झाला.