नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १८ नोव्हेंबरपासून ते १३ डिसेंबर दरम्यान होणार आहे. संसदीय कार्य मंत्रालयाने या संदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहातील सचिवांना माहिती दिली.या अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर करण्याच्या प्रयत्नात आहे. तर विरोधक विरोधी मंदी, जम्मू-काश्मीरशी संबंधित विषयांवर सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत.
येत्या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण बिले सादर करणार आहे. त्यापैकी दोन महत्त्वाच्या अध्यादेशांवर कायदे करण्यावर सरकार काम करीत आहे. यापैकी एक अध्यादेश आयकर कायदा, १९६१ आणि वित्त अधिनियम, २०१९ मध्ये सुधारना करण्यासाठी सप्टेंबरमध्ये जारी करण्यात आला होता. दुसरा अध्यादेश सप्टेंबरमध्ये जारी करण्यात आला होता ज्यात ई-सिगारेट आणि तत्सम उपकरणांच्या विक्री, उत्पादन आणि साठवणुकीवरील बंदीसाठी करण्यात आला होता. मागील दोन वर्षे हिवाळी अधिवेशन २१ नोव्हेंबरपासून सुरू झाले आणि ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालले.