गोडी दिवाळी फराळाची , साथ रुचियाना गुळाची !

    18-Oct-2019
Total Views | 237


 

काही काही बाबतीत आपण तडजोड नाहीच स्वीकारत. कारण त्या आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. दिवाळीचा फराळ घरी करणं हा त्यातलाच एक भाग. आजच्या धावपळीच्या युगात नोकरदार गृहिणींना वेळेअभावी नाईलाजास्तव फराळाचे काही पदार्थ बाहेरून विकत आणावे लागतात. पण निदान गोडाचे पदार्थ तरी आपण घरीच करावेत असा गृहिणींचा आटोकाट प्रयत्न असतो. दिवाळीत हमखास होणारे गोडाचे पदार्थ म्हणजे शंकरपाळे आणि अनारसे. यातला अनारशासारखा पदार्थ तसं पाहायला गेलं तर करायला बराच किचकट. पण सुगरण गृहिणी हे आव्हान स्वीकारून अनारसे करतातच. यात गृहिणीचं कौशल्य जसं महत्त्वाचं असतं तसच महत्त्वाचं असतं त्यातलं गुळाचं प्रमाण. बाजारात मिळणारी गुळाची ढेप फोडून नाहीतर किसून तो योग्य प्रमाणात अनारशाच्या पिठात घालणं हा गृहिणींसाठी एक कंटाळवाणा भाग असतो. पण गुळाशिवाय अनारसे होणार कसे ?

 

 
 

आता मात्र गृहिणींना हा प्रश्न सतावणार नाही. कारण पितांबरीनं रुचियाना रसायनविरहित गूळ आणला आहे. तोदेखील पावडर स्वरूपात. गूळ ढेपेऐवजी गूळ पावडर हे उत्तमच झालं. पण रसायनविरहित गूळ म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. बाजारात मिळणारा स्वच्छ पिवळाधमक गूळ म्हणजे उत्तम प्रतीचा गूळ नव्हे.उसाचा रस तापवून त्यापासून गूळ तयार होत असताना त्यात रासायनिक पदार्थ मिसळले जातात. त्या शिवाय ढेप लवकर जमण्यासाठी त्यात चुना किंवा काही रासायनिक बाइंडिंग एजंटही मिसळले जातात. अशा गुळामुळे अनेक प्रकारचे त्रास होतात. या रसायनांच्या वापरामुळे गुळाच्या चवीतही फरक पडतो.

 

पितांबरी रुचियाना गूळ तयार करताना त्यात कोणत्याही प्रकारचं रसायन मिसळलं जात नाही. ऊस पिकवतानाही रासायनिक खतं किंवा जंतुनाशकं वापरलेली नसल्यामुळे तो पूर्णपणानं सेंद्रिय असतो. उसाचा रस तापवताना तयार होणारी मळी दूर करण्यासाठी खायच्या भेंडीसारख्या पूर्णतः नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो.

 

गूळ फक्त चवीसाठीच नाही तर त्याच्या आरोग्यदायी गुणांसाठीही पदार्थांमध्ये वापरला जातो. गुळात सुक्रोजसोबत खनिजं, क्षार, लोह, आणि तंतुमय पदार्थ असतात. त्याचं पचन संथ गतीनं होतं आणि त्यातून मिळणारी ऊर्जाही संथ गतीनं होते आणि दीर्घकाळ टिकते. त्यामुळे शरीरासाठी लाभदायक आहे. त्यामुळेच मधुमेह टाळण्यासाठी आणि मधुमेह असणाऱ्यांसाठीही देखील साखरेपेक्षा गूळ लाभदायक आहे.

 

अशा गुणकारी पितांबरी रुचियाना गूळ पावडरीमुळे या वेळी दिवाळीच्या फराळाची गोडी अधिकच वाढणार आहे.


 



 

अग्रलेख
जरुर वाचा
बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा सुरू केली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रो-रो सेवेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणवासीयांना आणि पर्यटकांन..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121