एक राष्ट्र एक ओळखपत्र सेवा लवकरच

    04-Sep-2018
Total Views | 16



नवी दिल्ली: भारतामध्ये लवकरच एक राष्ट्र एक ओळखपत्र या सेवेची सुरुवात होईल, असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी माहिती दिली. या सेवेमुळे राष्ट्राची दळणवळण सेवा अखंडित होईल व याचा फायदा आर्थिकव्यवस्थेला होईल असाही विश्वास त्यांनी दर्शवला. पुढे माहिती देताना कांत यांनी असेही सांगतले की, एक मजबूत वाहतूक क्षेत्र कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुख्य आधार आहे. विशेषत: भारतासारखा घनदाट रहिवाशी असलेला विकासशील राष्ट्र हा राष्ट्राच्या गतिशील धोरणाचा केंद्रबिंदू असून सार्वजनिक वाहतुकीच्या टिकाऊ रीतींवर अवलंबून होता.

 

फ्यूचर मोबिलिटी सम्मिट २०१८ मध्ये पुढे सीईओ म्हणाले, "मजबूत वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असतो. नवीन व्यवस्थेचा हेतू नागरिकांना सार्वजनिक साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. यासाठी पुढच्या पिढीची वाहतूक व्यवस्था बनवली पाहिजे."

 

अमिताभ कांत यांनी सांगितले की, "भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) वाहतूक केवळ ४ टक्के आहे. ही वाहतूक बहुतेक पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून आहे. देशाच्या मोठमोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण होण्यामागे गाडयांचा वापर हे एक मोठे कारण आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीमुळे देशाच्या चलन साठवणांवर देखील परिणाम होतो."

 

नीती आयोगचे सल्लागार अनिल श्रीवास्तव यांनी कार्यक्रमात सांगितले की, "पर्यावरणविषयक दृष्टिकोणातून सरकार वाहतूक यंत्रणेवर काम करत आहे. त्यामुळे लोकांनी खाजगी गाड्यांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनाचा उपयोग केला पाहिजे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121