पर्यावरणदिनी रेल्वे प्रशासनाची रॅली
भुसावळ, ५ जून
पर्यावरणदिना निमित्त ५ रोजी रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेकडील बुकिंग कार्यालय येथून पर्यावरण रॅली काढण्यात आली. या रॅलीस अपर विभागीय रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवुन रॅलीस सुरवात झाली.
ही पर्यावरण रॅली रेल्वे रुग्णालयमार्गे , गांधी पुतळा, ताप्ती क्लब येथून रेल्वे स्काऊट -गाईड मैदानावर येवून समारोप झाला.
समारोप प्रसंगी एडीआरएम मनोज सिन्हा, विभागीय वरिषठ अभियंता (पर्यावरण व गृहप्रबंध) पी. रामचंद्रन,वरिष्ठ अभियंता एम.एस.तोमर, वाणिज्य प्रबंधक व्ही.पी.दहाट, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक बी . अरुण कुमार यांनी वृक्षारोपण करुन पर्यावरण बचाव चा संदेश दिला.
रॅलीत रेल्वे स्काऊट गाईड चे विद्यार्थी तसेच विभागीय वरिष्ठ अधिकारी मनोज गांगुर्डे, वरिष्ठ अभियंता विनोद भंगाळे, अजय कुमार, जी.आर.अय्यर, वरिष्ठ वाणिज्य निरिक्षक सुदर्शन देशपांडे हे उपस्थित होते.