जळगाव, 18 नोव्हेंबर
केरळातील कालिकत येथे शनिवारी संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत भारोत्तोलन या खेळात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदक प्राप्त केले.
कालिकत येथील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ भारोत्तोलन स्पर्धेच्या 55 किलो गटामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशांत कोळी या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्रटकावले. तो फैजपूर येथील डी. एन. महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
या संघासमवेत प्रशिक्षक डॉ. गोविंद मारतळे, संघ व्यवस्थापक डॉ. मुकेश पवार होते. कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील आदींनी प्रशांत कोळीचे अभिनंदन केले आहे.