मुंबई विमानतळ ५ वाजेपर्यंत बंद !

    23-Oct-2018
Total Views | 12
 
 

मुंबई : प्रचंड व्यस्त विमानतळांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहे. विमानतळाची मुख्य आणि द्वितिय धावपट्ट्या आज सहा तासांसाठी बंद राहणार आहेत. या धावपट्ट्यांचे काम सुरू असल्याने सकाळी ११ वाजल्यापासून धावपट्ट्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, रद्द विमाने आणि त्यांच्या वेळेतील बदलाची माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील मुख्य धावपट्टी आणि द्वितिय धावपट्टीवर आज दुरूस्तीचे काम सुरू राहणार आहे. दोन टप्प्यांमध्ये विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू राहिल. यापैकी पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबरमध्ये होत आहे. त्यानंतर फेब्रुवारी ते ३० मार्चच्या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. यामध्ये 21 मार्च वगळता मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ११ ते या दरम्यान धावपट्टा बंद असणार आहेत. यामुळे दररोज उड्डाण घेणाऱ्या जवळपास ३०० विमानांवर याचा परिणाम होणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121