इगतपुरी रेल्वेस्थानकात मेगा ब्लॉक
26 पर्यंत वाहतुक विस्कळीत
भुसावळ, 22 ऑक्टोबर
मध्य रेल्वेच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात विशेष वाहतुक, पॉवर, आणि एस अॅण्ड टि ब्लॅाक 23, 24 , 25 व 26 ऑक्टोबर रोजी घेण्यात येत आहे. यामुळे रेल्वे वाहतुक प्रभावीत झाली असून काही गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.
इगतपुरी स्थानकात नवीन रुळ इंटरलॉकिंग पॅनल आणि यार्ड पुननिर्मिती करावयाची असल्याने हा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे 23 रोजी सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 वाजे पर्यंत येथून धावणा-या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्र. 12117/ 18 लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 51153 मुंबई- भुसावळ सवारी गाडी , 51154 भुसावळ - मुंबई सवारी गाडी (22 रोजी सुटणारी) या गाडी रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडयांच्या मार्गात बदल
गाडी क्र. 11025 भुसावळ- पुणे एक्सप्रेस वाया मनमाड - दौंड ,11026 पुणे - भुसावळ एक्सप्रेस व्हाया मनमाड - दौंड या गाडयांच्या मार्गात बदल केला आहे. तसेच ब्लॉक नंतर डाउन दिशेला धावणा-या गाडया आपल्या निर्धारीत वेळे पेक्षा 45 ते 50 मिनिटे उशिराने धावतील तसेच अप दिशेला धावणा-या गाडया 30 ते 40 मिनीटे उशिराने धावणार आहे.
24 रोजी 11.15 ते 2.15 वाजे दरम्यान गाडया रद्द
12117/18 लोकमान्य टिळक टर्मिनस - मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 51154/53 मुंबई - भुसावळ सवारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र. 11025/ 26 भुसावळ- पुणे एक्सप्रेस वाया मनमाड - दौंड च्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
गाडयांच्या वेळेत बदल
गाडी क्र. 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस निर्धारित वेळ 10.55 ऐवजी दुपारी 1 वाजेला धावेल. 12542 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस निर्धारित वेळे सकाळी 11.10 ऐवजी दुपारी 1.20 वा. सुटेल, 12362 मुंबई - आसनसोल एक्सप्रेस सकाळी 11.05 ऐवजी दुपारी 1.30 वा. सुटेल.
कमी अंतरावर धावणार गाडया
गाडी क्र. 13201 राजेंद्रनगर - लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ठाणे स्थानका पर्यंत तर 22511 लोकमान्य टिळक टर्मिनस कामख्या एक्सप्रेस खिर्डी स्थानकावर 100 मिनीटे नियमित करण्यात येणार आहे.
तसेच अप व डाऊन दिशेला जाणा-या गाडया 45 ते 60 मिनीटे उशिराने धावणार आहेत.
25 रोजी गाडी क्र. 12117/18 लोकमान्य टिळक टर्मिनस - मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 51154/53 मुंबई - भुसावळ सवारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र. 11025/ 26 भुसावळ- पुणे एक्सप्रेस वाया मनमाड - दौंड च्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
12142 पाटलीपुत्र - लो.टि.ट.एक्सप्रेस 82355 पटना - मुंबई सुविधा एक्सप्रेस , 11056 गोरखपुर – एल.टी.टी.एक्सप्रेस, 15018 गोरखपुर – एल.टी.टी.एक्सप्रेस या गाडयांचे भुसावळ विभागात नियोजन केले जाणार आहे. तसेच या गाडया त्यांच्या स्थानकांवर उशिराने पोहचतील .यादिवशी अप आणि डाउन दिशेला जाणा-या गाडया 35 ते 40 मिनीटे उशिराने धावतील.
26 रोजी सकाळी 11.15 ते दुपारी 2.15 वाजे दरम्यान 12117/18 लोकमान्य टिळक टर्मिनस - मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 51154/53 मुंबई - भुसावळ सवारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र. 11025/ 26 भुसावळ- पुणे एक्सप्रेस वाया मनमाड - दौंड च्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
12071 दादर – जालना जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी 2 वा. ऐवजी दुपारी 2.50 वा. सुटेल तर गाडी क्र. 13201 राजेंद्रनगर - लो.टि.टि. एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावेल.11061 एल.टि.टि. – दरभंगा एक्सप्रेस खर्डी स्थानकावर दुपारी 1.53 वा. पासून सायंकाळभ् 4.15 वा. पर्यंत असेल, 11083 एल.टि.टि.काझीपेठ एक्सप्रेस दुपारी 1.30 ते सायंकाळी 4.15 वा.पर्यंंत कसारा स्थानकावर असेल.11071 एल.टि.टि. इलाहाबाद कामायनी एक्सप्रेस दुपारी 2.11 वा. ते सायंकाळी 4.20 पर्यंत आटगाव स्थानकावर असेल.12617 एर्नाकूलम - हजरत निजामुद्दीन मंगला लक्षव्दिप एक्सप्रेस दुपारी 2.15 ते 4.20 वा. दरम्यान खडवली स्थानकावर असेल. डाउन दिशेला जाणा-या गाडया 45 ते 60 मिनिटे उशिराने तर अप दिशेला जाणा-या गाडया 30 ते 40 मिनीटे उशिराने निर्धारित स्थानकांवर पोहचतील.