केंद्र सरकारने न्यायालयांमध्ये सरकारविरुद्ध सुरू असलेल्या दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांचा भार कमी करण्यासाठी आणि अनावश्यक खटल्यांना आळा घालण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे.
Read More
भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवार, १० जुलै रोजी विधान परिषदेत केली.
(Sangli Crime) सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी या गावामध्ये एका शाळकरी मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला.
इस्लामी कट्टरतावाद्यांचे क्रौर्य दाखविणाऱ्या ‘उदयपूर फाईल्स’ हा चित्रपट ११ जुलै रोजीत प्रदर्शित होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी चित्रपटातील ४० ते ५० दृश्यांवर कात्री चालवली असल्याचे सेन्सॉर बोर्डाने स्पष्ट केले आहे.
उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.
(Love Jihad Funding Case) मध्य प्रदेशमधील इंदूर येथील काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरी यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) लव्ह जिहादचा कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू महिलांना फसविण्यासाठी, त्यांच्याशी लग्न करुन धर्मांतर करण्यासाठी पैसे पुरवल्याप्रकरणी कादरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
(Beed Crime) बीडच्या केज तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. नानासाहेब चौरे या नराधमाने एका गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नानासाहेब चौरे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असून या प्रकरणात कोणताही लैंगिक अत्याचार किंवा हत्या झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत त्यांच्या मुलीच्या मृत्यूला गूढ व अमानवी स्वरूप असल्याचे नमूद करत, सीबीआय आणि उबाठाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूरी चप्पल म्हणजे भारतीय ब्रँड. सांस्कृतिक आणि एतिहासीक वारसाहीही. आकर्षक, टिकाऊ आणि आरोग्यदायी असणारी कोल्हापुरी चप्पल जगभरात देश-विदेशात विकली जाते. स्थानिक भाषेत या पादत्राणांना पायतान म्हणून संबोधले जाते. मात्र नुकतेच इटालियन लग्झुरी फॅशन ब्रँड ‘प्रादा’ने कोल्हापुरी चप्पलसारखे पादत्राण यंदाच्या फॅशन महोत्सवात वापरले.या प्रकरणामुळे देशभरात वादचर्चा सुरू झाली.
प्रसिद्ध पटकथा लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आहे. 'कॉपीराइट कायदा, १९५७' अंतर्गत घोष यांच्यावर फौजदारी खटला दाखल झाला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असता, सर्वोच्च न्यायालयाने दंडाधिकारी यांच्या समोर वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासूनही सूट देत घोष यांना दिलासा दिला आहे.
हैदराबाद येथील रेल्वे ट्रॅकवर महिलांचा कार चालवण्याचा व्हिडिओ 'एक्स कॉर्प इंडिया' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याने रेल्वे मंत्रालयाने 'एक्स कॉर्प’ कंपनीला नोटीस बजावली होती. या कंपनीने मंगळवार दि. १ जुलै रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात नोटीसीविषयी हरकत याचिका दाखल केली.
(Kolkata Rape Case) पश्चिम बंगालच्या कोलकातामधील साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर कॉलेज प्रशासनाने सर्व वर्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत कॉलेज कॅम्पस बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
(Kolkata) कोलकात्यातील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेल्या चारपैकी तीन आरोपींनी हल्ल्याची पूर्वनियोजित योजना आखली होती, असे पीटीआयने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी तातडीने न्यायालयीन हस्तक्षेप आणि सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केली आहे.
कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्यम सिंह राजपूत यांनी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना खुले पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो घ्यावा आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.
(Kolkata Rape Case) कोलकाता लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत गार्डसह चार आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांना कॉलेजचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे.सात तासांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी पीडितेला जबरदस्तीने एका खोलीत नेल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फुटेजमुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत.
ग्रॅच्युइटी पेमेंट कायदा,१९७२ हा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू होतो आणि त्यांना या कायद्याअंतर्गत सेवानिवृती वेतन दिले पाहिजे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलिकडेच दिला आहे. प्रदीप पोकळे हे २०२० मध्ये अमरावती जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झाले होते. त्याअगोदर त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फौजदारी खटल्यामुळे त्यांचे निलंबन झाले होते. नियंत्रण प्राधिकरणाने २०२३ मध्ये प्रदीप पोकळे यांचा ग्रॅच्युइटी पेमेंटचा अर्ज मान्य करत जिल्हा परिषदेला १०% व्याजासह २० लाख र
(Kolkata Rape Case) दक्षिण कोलकाता येथील कसबा परिसरात असणाऱ्या साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची. पीडितेच्या तक्रारीवरुन कसबा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगा (NCW)ने स्वतःहून दखल घेत तीन दिवसांत कारवाई अहवाल मागवला आहे.
आणीबाणीच्या काळातील एडीएम जबलपूर या खटल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक इतिहासातील सर्वात काळा निर्णय होता, असे प्रतिपादन शनिवार, २१ जून रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. राज्यसभेतील इंटर्नसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि तिचे संस्थापक बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला उत्तराखंड उच्च न्यायालयाने, शनिवार, दि.१५ जून रोजी रद्द केला आहे. औषध आणि जादूई उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) प्रतिबंधक कायदा, १९५४ च्या कलम ३, ४ आणि ७ अंतर्गत या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीसांनी उघड केलेल्या माहीतीत राजाची पत्नी आरोपी सोनमसह हत्येत सहभागी असलेले उर्वरीत आरोपींनी तीनदा राजाला संपवण्याचे प्रयत्न केले होते. या तीन्ही प्रकरणात आरोपींना यश आले नाही. मेघालयात हनिमून दरम्यान आरोपी पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी भाड्याने आणलेल्या तीन गुडांसह राजाची हत्या केली.
11 मे रोजी इंदोरमध्ये राजा रघुवंशीचा विवाह सोनमशी झाला होता. दि. 20 मे रोजी ते दोघे मधुचंद्रासाठी मेघालयला गेलेे. दि. 23 मे पासून दोघांचे मोबाईल बंद होते. दि. 2 जून रोजी राजाचा मृतदेह वेसावडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीत आढळला. राजाचा मृतदेह सापडला, मात्र सोनम जिवंत आहे की मृत, हे समजत नव्हते. मात्र, दि. 9 जून रोजी पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान सोनमच्या भावाला सोनमचा फोन आला. तिने त्याला सांगितले की, ती गाझीपूरच्या नंदगंज भागातील एका ढाब्यामध्ये होती. पोलिसांच्या मते, राज रघुवंशीची हत्या त्याच्या पत्नीने सोनमने घडव
११ मे रोजी लग्न करून आपल्या पतीला मेघालयात हनिमूनसाठी घेऊन गेलेल्या सोनम रघुवंशीने आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी भाडोत्री गुंडाच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केली. ही हत्या विवाहबाह्य प्रेमसंबधातून झाल्याचे उघड झाले. सोनमने २३ मे रोजी तिचा पती राजा रघुवंशीची हत्या करत त्याचा मृतदेह खोल दरीत फेकून दिला. ही हत्या ९ तासांच्या कालावधीत अत्यंत नियोजनबद्धरित्या करण्यात आली.
(Ashok Dhodi Murder Case) तलासरी येथील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला रविवारी ८ जूनला सिलवासा येथून अटक करण्यात आली आहे. अशोक धोडींची ह्त्या करुन पाच महिन्यांपासून फरार झालेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला दादरा नगर हवेली येथे अविनाश थोडी लपून बसला असल्याची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.
मुंबई : नेटफ्लिक्सवर जागतिक पातळीवर टॉप १० नॉन-इंग्रजी कंटेंटच्या यादीत यंदा भारताच्या चार कलाकृतींनी स्थान पटकावले आहे. यात एक हिंदी सिरीज, एक हिंदी चित्रपट, एक तेलुगू आणि एक तमिळ चित्रपट यांचा समावेश आहे. यामधील द रॉयल्स ही वेब सिरीज सलग चौथ्या आठवड्यात ग्लोबल टॉप १० यादीत झळकली आहे. तर सलमान खानचा सिकंदर, कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित रेट्रो आणि तेलुगू हिट सिरीजचा पुढील भाग हीट : द थर्ड केस या तिघांनी यादीत नवीन एन्ट्री केली आहे.
(Sharmistha Panoli Arrest Case) कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला तुरूंगात मूलभूत सुविधा नाकारल्या गेल्याचा आणि तिला धमक्या मिळाल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. शर्मिष्ठाचे वकील मोहम्मद समीमुद्दीन यांनी यासंदर्भात अलीपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने ४ जूनपर्यंत या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
देशात कोरोना महामारी रुग्णांची संख्या चार हजारांवर पोहोचली असून ३ जून २०२५ रोजी, देशात ४,०२६ सक्रीय रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या २४ तासांत पाच नवे मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये ८० वर्षांच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनिया झाला होता. महाराष्ट्रात ७० आणि ७३ वर्षांच्या दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
विराट कोहलीच्या बेंगळुरूस्थित पबमध्ये स्मोकिंग झोन नसल्याने गुन्हा झाला आहे. कोहलीच्या वन८ कम्युन पबला स्मोकिंग झोनच नसल्याने हा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. क्यूबन पार्क पोलिसांनी सिगारेट आणि तंबाखू उत्पादन कायदा अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात न्यायालयीन बदल्यांनंतर दिल्ली दंगल कट प्रकरणावर न्यायालय नव्याने युक्तीवाद ऐकणार आहे.
विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटल्यात सात्यकी सावरकर यांची मातृवंशावळ तपासण्याची विनंती करणारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अर्ज पुणे येथील विशेष आमदार – खासदार (एमपी/एमएलए) न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे खटल्यास वेगळे वळण देण्यासाठी नथुराम गोडसेचा आधार घेण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.
(Vipul Dushing) पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयात हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या वकिल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. काही वर्षांपूर्वीचं हे प्रकरण असून आता पुन्हा चर्चेत आलं आहे.
(Vaishnavi Hagwane Case Hearing) वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती,
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी कुठल्याही पक्षाशी संबंधित असला तरी राजकारण विरहित त्याच्यावर कारवाई होईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. मंगळवार, २७ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Vaishnavi Hagavane suicide case in Pune is currently making headlines across the state. Even in this modern era such ruthless inhumane incidents happen in an educated society पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या आधुनिक काळातदेखील अशा प्रकारच्या निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणार्या घटना सुशिक्षित समाजात घडतात, यातूनच त्यांची नेमकी ‘हुशारी’ लक्षात येते.
‘बिग बॉस ७’ फेम अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारणारा एजाज खान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. मुंबईतील एका अभिनेत्रीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर चारकोप पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर एजाज खान फरार असून, त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
अभिनेता एजाज खानवर रविवारी एका महिला अभिनेत्रीनं बलात्काराचा आरोप करत चर्कोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चित्रपटसृष्टीत संधी देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्या महिलेने केला आहे. याआधीच ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोमुळे एजाज खान वादात सापडले असून, त्याविरोधात अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आली होती.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविरोधात ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे वक्तव्य समाजात द्वेषभावना पसरवणारे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
(Jodhpur Love Jihad Case) राजस्थान येथील जोधपूरमधून लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. लव्ह जिहादच्या नावाखाली निष्पाप हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटना एकामागून एक उघडकीस येत आहेत. अवघ्या दोन दिवसांत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी २० एप्रिल रोजी जोधपूरच्या खांडा फालसा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने स्नॅपचॅटवर 'अशोक मालवीय' हे नाव वापरत हिंदू असल्याचे भासवत एका अल्पवयीन मुलीशी मैत्री केली होती.
( Case against mangrove forest destroyer ) दिवा पश्चिमेकडील देसाई खाडीपट्ट्यात भूमाफियांनी बेकायदा खारफुटींची कत्तल करून भराव केल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी, दिवा यांनी मुंब्रा मंडळ अधिकारी यांच्या समवेत मौजे दिवा येथील उग्रेश्वर मंदिराजवळ गणेश घाट या खाडीलगत भागाची समक्ष स्थळ पाहणी केली होती.
(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
(Asif Mansoori mumbra case ) मुंब्य्रात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने हत्या करीत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणार्या नराधम आसिफ मन्सुरी याच्या घृणास्पद कृत्याचे सर्वत्र पडसाद उमटत असून संताप व्यक्त होत आहे. भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या समवेत शेकडो नागरिकांनी बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक दिली.
(Akashwani Amdar Nivas) मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ६१ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
( Case registered against 43 Bangladeshis for registering bogus births and deaths in Jalgaon ) राज्यात बांगलादेशी, रोहिंग्यांच्या बोगस जन्म-मृत्यूनोंदणीचे प्रकार गाजत असताना आता जळगाव महानगरपालिका हद्दीत बोगस जन्मनोंदप्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथे ४३ बांगलादेशींवर विविध कलमांन्वये शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार नवीनचंद्र अशोक भावसार यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
(Tanisha Bhise death case) भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे आपला जीव गमवावा लागला. तनिषा यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला थेट मंत्रालयातून फोन आला होता. मात्र, तरीही रुग्णालायाने तनिषा यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तनिषा यांची नणंद प्रियंका पाटील यांनी केला आहे.
(Pune Pregnant Woman Case) पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारमुळे गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
(Gangwar in Beed Jail) गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरलेला वाल्मिक कराड. कुठल्यान कुठल्या कारणामुळे हे नाव सतत समोर येत राहिले. सध्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र चर्चा त्याच्या दहशतीची नसून त्याला झालेल्या मारहाणीची आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आलीय. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली.
कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणी शनिवारी वाढल्या, कारण पश्चिम मुंबईतील खार पोलीस ठाण्यात त्याच्या वादग्रस्त स्टँड-अप कॉमेडी परफॉर्मन्ससंदर्भात तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या. या परफॉर्मन्समध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक टिप्पणीचा समावेश होता.
( Chief Minister Devendra Fadanvis on RERA fraud case ) ‘रेरा’ फसवणूक प्रकरणी त्या ६५ बांधकामांमधील एकाही रहिवाशांला बेघर होऊ देणार नाही. खोटे कागदपत्रे सादर करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांना फसवले आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांना तुरुंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी अधिवेशनात जाहीर केले.
Santosh Deshmukh Case Hearing : वकील Ujjwal Nikam यांचा पहिलाच युक्तिवाद, बीडच्या कोर्टात काय झालं?
स्वारगेट अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील पीडितेने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले असून त्यात पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या घटनेला आणखी नवे वळण मिळाले आहे.