सांगलीच्या अवलियाने ठाण्यात विश्वविक्रम केला आहे. पंडित तुकाराम धायगुडे (४३) असे त्यांचे नाव असून ते ठाणे जिल्हा बँकेत शिपाई आहेत. त्यांनी २५७ किलो वजनाच्या सहा दुचाकी ३७७ वेळा चक्क पोटावरून नेण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वीही १२२ वेळा पोटावरून दुचाकी नेऊन धायगुडे यांनी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ नोंदवला होता. रविवारी ठाणे पूर्वेकडील धर्मवीर क्रीडासंकुलात धायगुडे यांनी आपलाच हा विश्वविक्रम मोडून नवा विक्रम स्थापित केला आहे. या विश्वविक्रमी कामगिरीमुळे धायगुडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Read More
मविआची छत्रपती संभाजीनगर येथील सभा म्हणजे वज्रमुठ नसुन सत्तेसाठी हपापलेल्या खोट्या लोकांची वज्रझूठ सभा आहे.अशी खिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडवली आहे. रविवारी सायंकाळी ठाण्यातील आनंद आश्रम येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी येत्या ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार - खासदारां सह अयोध्या दौर्यावर जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सातत्याने लोकांमध्ये राहणार व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे ही तळमळ घेऊन ते काम करतात. त्यामुळे त्यांची वाटचाल ही नेते पदापासून लोकनेते पदाकडे चालली आहे. लोकनेता कोणाला होता येत नाही, कारण जनता लोकनेता करत असते, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावेळी आयोजीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून फडणवीस यांनी जोरदार बॅटींग केली.
वसई-विरार मनपा आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतींमधील नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
वसई-विरार महापालिका आणि पालघर पट्ट्यातील विविध नगर पंचायतीमधील एकूण ५० नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे
विधान परिषद आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र फाटक रॅडिसन ब्लू येथे आज पोहोचले. याच रॅडिसन ब्लूमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्यास आहेत. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आपल्या ४० समर्थक आमदारांसकट आधी गुजरातच्या सुरतमध्ये त्यानंतर आसामच्या गुवाहाटीमध्ये गेले आहेत. या मुळे महाविकास आघाडी सरकार अल्प मतात आल्याची चर्चा आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकेचे बिगुल काही दिवसांत वाजणार असून निवडणुकीपूर्वीच ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांचे कार्यकर्ते भर रस्त्यात एकमेकांना भिडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
ठाण्यात शिवसेना आमदाराच्या कार्यालयात झालेल्या मद्यवाटप कार्यक्रमाचा भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी घेतला समाचार
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शिवसेना नगरसेवकाने ठाण्यात केलेल्या दारू वाटपावरून प्रचंड टीकेची झोड सोशल मिडीयावर उठली होती. याचवरून नेटकऱ्यांनी विविध मीम्स बनवून शिवसेनेच्या मद्य वाटपाला टार्गेट केले आहे. मनसेने तर 'शिवसेनेचे दारू वाटप आणि मनसेचे आमरस पुरी वाटप' अशा टॅगलाइनचे बॅनर सर्वत्र व्हायरल केल्याने शिवसैनिकांची पुरती गोची झाली आहे.