(Thane) वाढीव वेतन मिळावे यासाठी ठाणे परिवहनच्या (TMT) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या शिलेदारांनी मध्यस्थी केल्यानंतर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले. टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे आश्वासन यावेळी बैठकीत देण्यात आले आहे.
Read More
ठाणे : बाल लैंगिक शोषणाविरुद्ध बाल सुरक्षा जनजागृती अंतर्गत “#ProtectedByPOCSO” ही मोहिम राबविण्यात येत आहे. यानिमित्त ठाणे परिवहन (टीएमटी) ( TMT Buses ) विभागाच्या बसेसमध्ये “#ProtectedByPOCSO” हा संदेश असलेले पोस्टर लावण्यात आले.
ठाणे : प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे मनपा परिवहन सेवेचे नवीन अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे प्रवाशांना यूपीआयद्वारे डिजिटल तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या टीएमटीचे तिकीट ( TMT Ticket ) आता घरी बसून काढता येणार आहे. लवकरच अॅप सुरू होणार असून त्यामुळे सुट्या पैशांची कटकट मिटणार आहे.
ठाणे : नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या तयारीचा आढावा घेतला. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी आणि उपस्थित नागरिकांना सोहळ्याचा आनंद घेता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे कामे करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. या भव्य सोहळ्यासाठी ठाणे महापालिकेनेही शेकडो टीएमटी बसेससह घनकचरा व आरोग्य यंत्रणा सज्ज
ठाणे परिवहन सेवेने मे. सिटी लाईफ लाईन प्रा. लि. या कंपनीला मुंब्रा- कौसा भागात बसगाड्या चालविण्याचा ठेका दिला आहे.मात्र, या मार्गावर असलेल्या बसथांब्यांवर संबधित ठेकेदाराच्या बसगाड्या जाणीवपूर्वक थांबविल्या जात नाहीत. बस न थांबविल्याने प्रवाशांची संख्या कमी होत आहे, असे दाखवून या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा घाट मे. सिटी लाईफ लाईन प्रा. लि. या कंपनीचे प्रवर्तक अनिल शर्मा यांनी आखला आहे.
कांजुरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जागेवरून वातावरण तापलेले असताना त्याचे पडसाद ठाणे महापालिकेच्या महासभेत उमटलेले दिसून आले. कारण बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने गुंडाळला आहे.
२०० बसची खरेदी आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी १६० कोटींचा आराखडा